Gold Prices Today | सोने दोन वर्षाच्या उच्चांकाजवळ, जाणून घ्या प्रति तोळ्याचा भाव

File Photo
File Photo
Published on
Updated on

Gold Prices Today : अमेरिकन डॉलरच्या कमजोरीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याला झळाळी मिळाली आहे. देशातील सराफा बाजारातही सोन्याचा दर दोन वर्षाच्या उच्चांकाजवळ पोहोचला आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर आज मंगळवारी प्रति १० ग्रॅम ५५,७०२ रुपयांवर खुला झाला. तर चांदी प्रति किलो ६९,६५९ रुपयांवर पोहोचली. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याने सहा महिन्यांच्या उच्चांकावर झेप घेतली आहे. ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याने ५६,२०० रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला होता. आता सोने ५६ हजारांजवळ पोहोचले आहे.

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, आज मंगळवारी (दि.३) २४ कॅरेट सोने ५५,७०२ रुपये, २३ कॅरेट ५५,४७९ रुपये, २२ कॅरेट ५१,०२३ रुपये, १८ कॅरेट ४१,७७७ रुपये, १४ कॅरेटचा दर ३२,५८६ रुपयांवर खुला झाला आहे. तर चांदीचा प्रति किलो दर ६९,६५९ रुपये आहे.

मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (MCX) वर मंगळवारी सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ५५,५४६ रुपयांवर पोहोचला होता. तर चांदीचा दर १.४ टक्क्यांनी वाढून प्रति किलो ७०,५७३ रुपयांवर पोहोचला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्ड ०.८ टक्क्यांनी वाढून प्रति औंस १,८३८ डॉलरवर तर स्पॉट सिल्व्हर १.१ टक्क्यांनी वाढून २४.२५ डॉलरवर पोहोचले. (Gold Prices Today)

शुद्ध सोने असे ओळखा?

सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news