Gold Price Updates : सात दिवसांत सोने २,५०० रुपयांनी महागले, एका वर्षातील उच्चांकी स्तरावर

Gold rate today
Gold rate today
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

Gold Price Updates : युक्रेन- रशियातील तणावाचा परिणाम भारतीय शेअर बाजारासह मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (Multi Commodity Exchange) दिसून येत आहे. भारतीय बाजारात सलग ७ व्या दिवशी सोन्याच्या दरात तेजी दिसून आली. मंगळवारी एमसीएक्सवर (MCX) सोन्याने ५० हजारांचा टप्पा पार केला. एमसीएक्सवर गोल्ड फ्यूचर्समध्ये (MCX gold futures) ०.६ टक्के वाढ होऊन दर प्रति १० ग्रॅम ५०,२०५ रुपयांवर पोहोचला. तर चांदीचा दर प्रति किलो ६४,५८० रुपयांवर गेला आहे. गेल्या सात दिवसांत सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम मागे २,५०० रुपयांनी वाढ झाली आहे.

जगात काही भागात तणावाची परिस्थिती अथवा संकटे निर्माण होतात त्यावेळी त्याचा परिणाम शेअर बाजारावर होतो. शेअर बाजार कोसळल्यामुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान होते. यामुळे गुंतवणूकदार सेफ हेवन मालमत्ता म्हणून सोन्यात गुंतवणूक करतात. यामुळे सोने तेजीत येते. सध्या अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. सोने ८ महिन्यांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचले आहे.

ब्लूमबर्गच्या माहितीनुसार, सोन्याच्या दरात (Spot gold) ०.४ टक्के वाढून ते १,८७८.९३ डॉलर प्रति औंसवर पोहोचले. युक्रेनवरील संकटामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात ३१ जानेवारी नंतर सोन्याच्या दरात ५ टक्के मजबुती दिसून येत आहे. चांदीच्या दरात (spot silver) ०.३ टक्के वाढ होऊन ती २३.९१ डॉलर प्रति औंसवर पोहोचली आहे. ((१ औंस म्हणजे २८.३५ ग्रॅम, १ तोळा म्हणजे १० ग्रॅम)

इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, (Gold Price Updates) आज मंगळवारी शुद्ध सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ५०,३५६ रुपयांवर पोहोचला. तर २३ कॅरेट सोने ५०,१५४ रुपये, २२ कॅरेट सोने ४६,१२६ रुपये, १८ कॅरेट सोने ३७,७६७ रुपये आणि १४ कॅरेट सोने २९,४५८ रुपयांवर आहे. चांदीचा दर प्रति किलो ६४,४४० रुपयांवर गेला आहे.

शुद्ध सोने कसे ओळखाल?

सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : कोल्हापुरी साज बनतो तरी कसा? चला पाहूया | Kolhapuri Saaj

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news