भाजपचे साडे तीन नेते कोण; ईडी, सीबीआयलाही निमंत्रण ! संजय राऊत आज कोणता बॉम्ब टाकणार ? | पुढारी

भाजपचे साडे तीन नेते कोण; ईडी, सीबीआयलाही निमंत्रण ! संजय राऊत आज कोणता बॉम्ब टाकणार ?

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राजकारणात एक मर्यादा असते, पण ती मर्यादा ओलांडली गेली आहे. आम्ही खूप सहन केले, पण आता त्यांना उद्ध्वस्त करणार आहोत. महाराष्ट्रातसुद्धा सरकार आहे आणि हे सरकार शिवसेनेच्या नेतृत्वातील आहे हे लक्षात घ्या. पुढील काही दिवसांत भाजपचे साडेतीन जण कोठडीत जातील, असा इशारा शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी सोमवारी दिला.

दुसरीकडे सामना अजून बाकी आहे, आधी सामना तर होऊ द्या, मग बघू काय ते… अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्‍त केली आहे. त्यामुळे होणार तरी काय ? याची चर्चा आहे. आज सायंकाळी ४ वाजता शिवसेना भवनमध्ये पत्रकार परिषद होत आहे.

‘अर्थव्यवस्था ५ ट्रिलीयन डॉलर्स होण्याचे सोडा, पण सात वर्षात ५.३५ ट्रिलीयन डॉलर्सचा बँक घोटाळा’

काही जण हा जेलमध्ये जाईल, तो जेलमध्ये जाईल, अनिल देशमुखांच्या कोठडीच्या बाजूला जाईल असे बोलत आहेत. आता साडेतीन लोकांना कोठडीत ठेवण्याची तयारी सुरू आहे. मी कोणाविषयी बोलतोय हे सर्वांना माहिती आहे. त्यांची झोप उडाली आहे. तपास यंत्रणांच्या व केंद्र सरकारच्या धमक्या आम्हाला देऊ नका, आम्ही घाबरणारे नाही. जे काही करायचे ते करा. पाहू कोणात किती दम आहे, असा इशाराही संजय राऊत यांनी यावेळी दिला.

शिवजयंतीला 500, ज्योतीला 200 जणांना परवानगी देणार

महाराष्ट्र काय आहे ते मंगळवारी सगळ्यांना कळेल. उद्या शिवसेना नाही तर महाराष्ट्र, मराठी माणूस बोलेल, असे सांगून राऊत म्हणाले, शिवसेनेच्या वतीने मंगळवारी सायंकाळी शिवसेना भवनात पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेवेळी शिवसेनेचे सर्व नेते, पदाधिकारी, मंत्री, आमदार- खासदार उपस्थित राहतील. उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसारच ही पत्रकार परिषद होत आहे. ही पत्रकार परिषद जनता, भाजप, केंद्रीय तपास यंत्रणांनीही ऐकावी.

शक्‍तिप्रदर्शनाची चिन्हे

शिवसेना भवनात होणार्‍या पत्रकार परिषदेला पक्षाचे नेते, खासदार उपस्थित राहतील. शिवसैनिकही उद्या जमतील. आम्ही कोणाला बोलावले नाही, पण शिवसैनिक स्वतः येतील. शिवसेनेला शक्तिप्रदर्शन करण्याची गरज नाही. सध्या ज्या घडामोडी सुरू आहेत, काय काय केले जातेय, कोणावर कसा दबाव टाकला जातोय, यावर उद्या भाष्य केले जाईल, असे शिवसेना नेते, खासदार अनिल देसाई यांनी सांगितले. आता कुठे टॉस झाला आहे.

मराठा समाजाच्या मागण्यांसाठी २६ फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण : खासदार संभाजीराजे छत्रपती

विषय भरकटवण्यासाठी पत्रकार परिषद : सोमय्या

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची मंगळवारी होणारी पत्रकार परिषद आपल्यावरील घोटाळ्यांचा विषय भरकटवण्यासाठीच आहे. त्यांनी खुशाल पत्रकार परिषद घ्यावी, पण आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही द्यावीत, असे सोमय्या म्हणाले. मी मागे हटणार नसून माझी बांधिलकी जनतेशी आहे, असे सोमय्या म्हणाले.

हे ही वाचलं का ?

Back to top button