Gold Rate Today : सोने ५० हजारांच्या जवळ, चांदीही महागली, जाणून घ्या नवे दर | पुढारी

Gold Rate Today : सोने ५० हजारांच्या जवळ, चांदीही महागली, जाणून घ्या नवे दर

पुढारी ऑनलाईन डेस्क

Gold Rate Today : सोन्याचे दर ५० हजारांच्या जवळ पोहोचले आहेत. सराफा बाजारात आज सोन्याच्या दरात तेजी दिसून आली. २४ कॅरेट म्हणजे शुद्ध सोने ८१९ रुपयांनी महागले. यामुळे सोमवारी (दि.१४) प्रति १० ग्रॅम (प्रति तोळा) सोन्याचा दर ४९,७३९ रुपयांवर पोहोचला. गेल्या शुक्रवारी सोन्याचा दर ४८,९२० रुपयांवर जाऊन बंद झाला होता. सोन्यासह चांदीही महागली आहे. चांदीचा प्रति किलो दर आज ६३,८६९ रुपयांवर खुला झाला. याआधी हा दर ६२,१५७ रुपयांवर जाऊन बंद झाला होता.

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या (India Bullion & Jewellers Association) माहितीनुसार, Gold Rate Today सोमवारी (दि.१४) २४ कॅरेट सोने ४९,७३९ रुपये, २३ कॅरेट सोने ४९,५४० रुपये, २२ कॅरेट ४५,५६१ रुपये, १८ कॅरेट सोने ३७,३०४ रुपये आणि १४ कॅरेट सोन्याचा भाव २९,०९७ रुपयांवर होता. (हे दुपारी १ पर्यंतचे अपडेटेड दर असून त्यात बदल होऊ शकतो)

चांदीचा भाव ८० हजारांवर जाणार?

दरम्यान, गुंतवणूकदारांचा सोन्यात गुंतवणूक करण्याकडे अधिक कल असतो. पण आता पुढील काही दिवसांत सोन्यासह चांदीत गुंतवणूक करण्यास हरकत नसल्याचे सराफा बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कारण पुढील वर्षभरात चांदीचा भाव ८० हजार प्रति किलो जाण्याची शक्यता आहे. सध्या सराफा बाजारात चांदीचा भाव प्रति किलो ६३ हजारांवर आहे. पुढील वर्षभरात चांदी महागणार असल्याचे संकेत तज्ज्ञांनी दिले आहेत.

तीन वर्षापूर्वी सोन्याच्या दराने ५६,२०० रुपयांपर्यंत उसळी घेत उच्चांक गाठला होता. पण २०२१ मधील ऑगस्टमध्ये सोने ४८ हजार रुपयांवर आले. आता पुन्हा सोने ५० हजारांवर पोहोचले आहे.

शुद्ध सोने कसे ओळखाल?

सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.

हे ही वाचा :

Back to top button