विराट कोहली, गौतम गंभीरला IPL आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल दंड

विराट कोहली, गौतम गंभीरला IPL आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल दंड

पुढारी ऑनलाईन डेस्क : लखनौ सुपर जायंट्सचा मार्गदर्शक गौतम गंभीर आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फलंदाज विराट कोहलीला आयपीएल आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल सामन्यातील मानधनाच्या १०० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. सोमवारी लखनौ येथील श्री अटलबिहारी वाजपेयी इकना स्टेडियमवर झालेल्या सामन्यादरम्यान कोहली आणि गंभीर यांच्यात वाद झाला होता. दोघांनीही आयपीएल आचारसंहितेच्या कलम २.२१ अंतर्गत लेव्हल २ गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यामुळे कोहली आणि गंभीरला त्यांच्या सामन्यातील मानधनाची सर्व रक्कम दंड म्हणून द्यावी लागणार आहे.

कोहली- गंभीर यांच्यात तुफान राडा; नेमकं प्रकरण काय?

आयपीएल 2023 च्या 43 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरने लखनौ सुपरजायंट्सचा 18 धावांनी पराभव केला. या सामन्यादरम्यान इकाना स्टेडिअमवर हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. सामन्यादरम्यान आणि नंतर दोन्ही संघांचे काही खेळाडू एकमेकांशी भिडताना दिसले. आरसीबीच्या पराभवानंतर लखनौच्या खेळाडूंकडून केलेल्या जल्लोषावरून वातावरण चांगलेच तापले. सामना संपल्यानंतर विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात जोरदार राडा झाला. बराच वेळ खडाजंगी झाल्यानंतर दोन्ही संघाच्या खेळाडूंनी मध्यस्थी करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

कोहली आणि गांगुली यांच्यामध्ये आयपीएलच्या सामन्यानंतर वाद झाल्याचे पाहायला मिळाले आहे. लखनौच्या फलंदाजीवेळी १७ व्या षटकात विराट कोहली आणि लखनौच्या नवीन उल हक यांच्यात वादाला सुरुवात झाली होती. जेव्हा विराट स्टंपच्या मागे धावत आला आणि नवीनला काहीतरी इशारा केला. त्यावर नवीनही त्याच्या जवळ आला आणि दोघांमध्ये वाद सुरू झाला. यावेळी आरसीबीचा दिनेश कार्तिक नवीनला आणि अंपायर कोहलीला घेऊन जातो. सामना संपल्यानंतर यावरुनच विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यामध्ये बाचाबाची झाली. सामन्यादरम्यान विराटने लखनौचे खेळाडू बाद झाल्यानंतर खूप रागाने सेलिब्रेशन केले होते. ज्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. नवीन आऊट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. बंगळुरच्या विजयानंतर जेव्हा दोन्ही संघांना हस्तांदोलन करण्याची वेळ आली तेव्हा गांगुलीने कोहलीशी हात मिळवला नाही, कोहली आल्यावर तो पुढे गेला आणि त्याने कोहलीला टाळले. यानंतर कोहली पुढे जातो आणि नवीनशी हस्तांदोलन करतो. नवीनही त्याच्याशी हस्तांदोलन करतो. यावर कोहली काहीतरी बोलताना दिसत आहे. कोहली बोलणार इतक्यात नवीनही काहीतरी बोलतो आणि येथेही दोघांमध्ये वादावादी झाली. प्रकरण इथेच थांबले नाही तर कोहली जेव्हा मैदानातून बाहेर जात असतो, तेव्हा तो लखनऊच्या काइल मेयर्सशी बोलू लागतो. तितक्यात गंभीर तिथे येतो आणि मेयर्सला घेऊन जातो. तो त्याला कोहलीशी बोलू देत नाही. यानंतर गंभीर काहीतरी बोलतो, ज्यावर कोहली त्याला जवळ बोलावतो आणि त्यांच्यामध्ये वाद होतो.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news