IPL CSK Vs PBKS : शेवटच्या चेंडूवर पंजाबने मिळवला विजय
पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रभसिमरन सिंग आणि लिवम लिविंगस्टोनची आक्रमक खेळी आणि जितेश शर्माने शेवटच्या षटकात केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर पंजाब किंग्जने शेवटच्या चेंडूवर ३ धावा काढत चेन्नईचा ४ विकेट्सने पराभव केला. हा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळवण्यात आला होता. नाणेफेक जिंकल्यानंतर चेन्नईने फलंदाजाचा निर्णय घेतला. यानंतर फलंदाजीसाठी उतलेल्या चेन्नईने पंजाब किंग्जसमोर २०१ धावांचे आव्हान ठेवले. (IPL CSK Vs PBKS)
दरम्यान चेन्नईचे आव्हान पंजाब किंग्जने शेवटच्या चेंडूवर गाठले. पंजाब कडून प्रभसिमनर सिंग २४ चेंडूमध्ये ४२ धावा, लिवम लिविंगस्टोन २४ चेंडूमध्ये ४० धावा, शिखर धवन १५ चेंडूमध्ये २८ धावा आणि जितेश शर्माने १० चेंडूमध्ये २१ धावांचे योगदान दिले. चेन्नई सुपर किंग्जकडून तुषार देशपांडे ३ तर रवींद्र जडेजाने २ विकेट्स पटकावल्या. तर पथिराणाने १ विकेट पटकावली. (IPL CSK Vs PBKS)
तत्पूर्वी, डेवॉन कॉनवेच्या आक्रमक अर्धशतकी खेळीच्या जोरावर चेन्नईने ही मोठी धावसंख्या उभी केली आहे. शिवाय, धोनीने शेवटच्या षटकात फटकेबाजी केली. चेन्नईकडून डेवॉन कॉनवे ५१ चेंडूमध्ये ९१ धावा, ऋतुराज गायकवाड ३१ चेंडूमध्ये ३७ धावा आणि शिवम दुबेने १७ चेंडूमध्ये २८ धावांचे योगदान दिले. पंजाब किंग्जकडून अर्शदीप सिंग, सिकंदर रझा, राहुल चहर आणि सॅम करन यांनी प्रत्येकी १ विकेट पटकावली.
चेन्नई सुपर किंग्ज 11 (IPL CSK Vs PBKS)
डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, मोईन अली, महेंद्रसिंग धोनी (कर्णधार/यष्टीरक्षक), तुषार देशपांडे, महिष टीक्षाना, मथिशा पाथिराना.
पंजाब किंग्ज 11 (IPL CSK Vs PBKS)
शिखर धवन (कर्णधार), अथर्व तायडे, लियाम लिव्हिंगस्टोन, सिकंदर रझा, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), सॅम करण, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग.

