गडचिरोली पोलिसांना ५१ लाखांचे बक्षीस : पालकमंत्री एकनाथ शिंदे

गडचिरोली पोलिसांना ५१ लाखांचे बक्षीस : पालकमंत्री एकनाथ शिंदे
गडचिरोली पोलिसांना ५१ लाखांचे बक्षीस : पालकमंत्री एकनाथ शिंदे

जहाल नक्षलवादी मिलिंद तेलतुंबडेसह २६ नक्षल्यांना कंठस्नान घातल्याबद्दल कारवाईत सहभागी पोलिसांना जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून ५१ लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज गडचिरोली येथे केली.

एकनाथ शिंदे यांनी आज संध्याकाळी गडचिरोली येथे पत्रकार परिषद घेतली. मर्दिनटोला येथील कारवाईबद्दल पोलिसांना बक्षीस दिल्याने त्यांचे मनोबल वाढेल तसेच त्यांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी या निधीचा निश्चितच फायदा होईल, असे ते यावेळी म्हणाले. पोलिस विभागाच्या अडचणी सोडविण्यासाठी आपण मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांशी चर्चा करु, असे सांगून, या कारवाईमुळे देशभरातील नक्षल चळवळीला जबर हादरा बसल्याचे शिंदे म्हणाले.

नक्षलविरोधी कामगिरी बजावणाऱ्या शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी राज्य सरकार भक्कमपणे उभे राहणार असून त्यांच्या मागण्यांची शासन दखल घेणार असल्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. यावेळी पोलिस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलिस अधीक्षक सोमय मुंडे उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news