Atul Kulkarni : फक्त दोन शब्दात अतुल कुलकर्णीचा विक्रम गोखलेंना जबरी टोला ! | पुढारी

Atul Kulkarni : फक्त दोन शब्दात अतुल कुलकर्णीचा विक्रम गोखलेंना जबरी टोला !

मुंबई, पुढारी ऑनलाईन :

कंगना राणावतने केलेल्या वक्तव्यावरुन वाद निर्माण झालेला असतानाच, त्या वाक्याचे अभिनेता विक्रम गोखले यांनी (Vikram Gokhle) समर्थन केल्याने परत या वादात भर पडली आहे. त्याला आता अतुल कुलकर्णीने (Atul Kulkarni) दोन शब्दात ट्विट करून गोखलेंना जबरी टोला दिला आहे.

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री कंगना राणावतने स्वातंत्र्याबद्दल एक वादग्रस्त विधान केलं. 1947 साली देशाला मिळालेलं स्वातंत्र्य म्हणजे भीक होती, खरे स्वातंत्र्य तर 2014 मध्ये मिळालं असं कंगना म्हणाली होती.

कंगना जे म्हणाली ते खरंय, मी त्याचे समर्थन करतो. देशाला कुणाच्याही मदतीने स्वातंत्र्य मिळालेले नाही, ते भिकेनेच मिळाले आहे. आपले स्वातंत्रवीर जेव्हा फाशीवर जात होते तेव्हा त्यांची फाशी कोणीही रोखली नाही. त्यांना वाचवण्यात आले नाही. अनेकजण फक्त बघतच राहिले होते असा गंभीर आरोप विक्रम गोखले (Atul Kulkarni) यांनी केला होता.

कंगनाच्या वक्तव्याला पाठिंबा देत देश कधीही हिरवा होणार नाही, हा देश भगवाच राहिला पाहिजे असेही ते म्हणाले होते. या सर्व प्रकरणावरून आता देशात मोठे वादंग निर्माण झाले आहे. कंगणा आणि विक्रम गोखले यांच्यावर सर्व स्तरातून टिका केली जात आहे.

आज अभिनेता अतुल कुलकर्णी याने एका वाक्यात ट्विट करून विक्रम गोखले (Atul Kulkarni) यांना जोरदार टोला लगावला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटलं आहे की, वयाचा आणि शहानपणाचा दुरान्वये संबंध नसतो.

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचा ७५ व्या वाढदिवसानिमित्त, ब्राह्मण महासंघाच्या वतीने सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना गोखलेंनी हे विधान केले होते.

त्याचबरोबर शिवसेना आणि भाजप एकत्र यावी अशीही अपेक्षा व्यक्त केली. 70 वर्षात जेवढा विकास झाला नाही तेवढा मोदींनी केला आहे. पक्षासाठी सर्व काम करतात, मात्र मोदीजी हे देशासाठी चांगलं काम करत आहेत. त्यांच्या या विधानांवरून सोशल मीडियातून त्यांच्यावर सडकून टीका होत आहे.

हे ही वाचा

Back to top button