दिल्ली नजिक रस्ते अपघातात बारामतीतील चौघांचा मृत्यू

दिल्ली नजिक रस्ते अपघातात बारामतीतील चौघांचा मृत्यू

बारामती : पुढारी वृत्तसेवा

चारधाम यात्रेसाठी निघालेल्या यात्रेकरूंच्या बोलेरो गाडीला दिल्ली नजीकच्या नोएडा जवळ झालेल्या भिषण अपघातात बारामतीतील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. गुरुवारी (दि. १२) पहाटे हा अपघात झाला आहे. मृतांमध्ये बारामतीतील चंद्रकांत नारायण बोराडे, सुवर्णा चंद्रकांत बोराडे हे दांपत्य, रंजना भरत पवार व मालन विश्वनाथ कुंभार या चौघांचा समावेश आहे.

या गाडीतून सात जण प्रवास करीत होते, त्या पैकी चार जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असून, अपघातग्रस्त गाडीचा चालक गंभीर जखमी आहे. गाडीमधील आणखी दोन महिला गंभीर जखमी झाले आहेत.
चारधाम यात्रेसाठी महाराष्ट्रातून एकूण पन्नास लोक निघाले होते. बुधवारी (दि. ११) रात्री वृंदावन या ठिकाणी त्यांनी मुक्काम केला. गुरुवारी (दि. १२) पहाटे साडेचार वाजता ते दिल्लीकडे जाण्यासाठी निघाले होते. नोएडा नजीक जेवर या गावा जवळ डंपरला भाविकांच्या बोलेरो गाडीने मागून जोरदार धडक दिली.

या गाडीचा चालक नारायण कोळेकर गंभीर जखमी झाला असून, त्याला अतिदक्षता विभागात हलविण्यात आले आहे. नोएडामधील रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याव्यतिरिक्त निपाणी येथील मुजावर कुटुंबातील दोन महिलादेखील या अपघातात जखमी झाल्या आहेत.

दरम्यान, बसमधील सर्व प्रवासी सुखरूप असून या प्रवाशांनी हा अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्तांना मदत केली. अपघात अतिशय भीषण होता त्यामुळे चार जणांचा जागीच मृत्यू झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या अपघाताची दखल घेतली असून, दिल्लीमध्ये यंत्रणेला मदतीचे आदेश त्यांनी स्वतः दिले आहेत. स्वतः अजित पवार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. त्यांच्यासह त्यांचे विशेष कार्य अधिकारी हनुमंत पाटील हे दिल्लीतील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news