प्रथम वर्ष बीए, बीकॉम गैरहजर विद्यार्थ्यांना परिक्षेची पुन्हा संधी!

प्रथम वर्ष बीए, बीकॉम गैरहजर विद्यार्थ्यांना परिक्षेची पुन्हा संधी!

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या बीए प्रथम वर्ष उर्दू, हिंदी, बीकॉम. आणि ग्राहक सेवा या शिक्षणक्रमाच्या अनुपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अंतिम लेखी परीक्षा दिनांक 17 व दि. 18 सप्टेंबर या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. मुक्त विद्यापीठाच्या प्रथम वर्ष बीए आणि बीकॉम शिक्षणक्रमांच्या उन्हाळी वार्षिक तसेच सत्र परीक्षा ऑनलाईन पद्धतीने सुरु आहेत.

काही ठिकाणी अतिवृष्टी, पूर, वादळ, वीजपुरवठा खंडित होणे, नेटवर्क नसणे, इत्यादी कारणांमुळे काही विद्यार्थ्यांना परीक्षेला उपस्थित राहता आले नाही. या किंवा इतर काही कारणांमुळे परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन परीक्षा देण्यासाठी पुन्हा एक संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

शुक्रवार दि. 17 सप्टेंबर ते शनिवार दि. 18 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 8 :00  ते रात्री 8:00 या वेळेत परीक्षा देता येईल. अधिक माहितीसाठी विद्याथ्र्यांनी विद्यापीठाच्या www.ycmou.ac.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

परीक्षेसाठी ycmou.unionline.in  या संकेतस्थळावर नोंदणी केल्यावर पुर्नपरीक्षा देता येईल, अशी माहिती मुक्त विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील यांनी दिली.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : चला पाहूया आदेश बांदेकरांच्या घरचा गणपती | Ganesh Festivel Special

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news