FIFA WC 2022 : मेस्सीला सतावणा-या ‘सॉल्ट बे’ला दणका; फिफा करणार कारवाई

FIFA WC 2022 : मेस्सीला सतावणा-या ‘सॉल्ट बे’ला दणका; फिफा करणार कारवाई
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : फिफा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत अर्जेंटिनाच्या विजयानंतर सॉल्ट बेने मैदानात धुमाकूळ घातला. त्याने खेळाडूंसोबत अर्जेंटिनाचा विजय साजरा केला. त्यासोबतच ट्रॉफीचे चुंबन घेताना तो दिसला याप्रकरणी फिफाने कारवाई सुरू केली आहे. यासोबतच अंतिम सामन्यानंतर काही लोकांना लुसेल स्टेडियममध्ये प्रवेश कसा दिला गेला याची फिफा चौकशी करत आहे. त्यांच्यावरही योग्य ती कारवाई केली जाईल असे फिफाने सांगितले आहे. (FIFA WC 2022)

सुरूवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडलेला फिफा वर्ल्ड कपचा समारोप झालेला आहे. परंतु, अजूनही स्पर्धेभोवतीचे वाद संपण्याचे नाव घेत नाहीत. अर्जेंटिनाच्या विजयानंतर सॉल्ट बे आणि इतर काही लोक मैदानात उतरून खेळाडूंसोबत विजय साजरा केला. त्यावेळचे व्हिडिओ चांगलेच व्हायरल झाले. अंतिम सामन्यानंतर या लोकांना मैदानात प्रवेश कसा देण्यात आला याची चौकशी फिफाने सुरू केली आहे. (FIFA WC 2022)

फिफा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत अर्जेंटिनाच्या विजयानंतर सॉल्ट बेने मैदानात धुमाकूळ घातला. त्याने खेळाडूंसोबत अर्जेंटिनाचा विजय साजरा केला आणि ट्रॉफीचे चुंबन घेता फोटो काढले. त्याने अनेक खेळाडूंसोबत फोटो काढले. या फोटोंमध्ये तो त्याच्या पदकासोबत फोटो काढताना दिसला होता.

कोण आहे सॉल्ट बे ?

सॉल्ट बे एक तुर्की शेफ आहे. त्याचे खरे नाव नुसरत गोक्से आहे. अर्जेंटिनाने अंतिम सामन्यात फ्रान्सचा पराभव करून विजेतेपद पटकावले. या विजयाचा आनंद मेस्सीच्या संघातील खेळाडूंनी जोरदार साजरा केला. सॉल्ट बे या देखील त्यावेळी मैदानात उपस्थित होता. सॉल्ट बे हा लक्झरी स्टीकहाऊस हॉटेल मालकचा आहे. या हॉटेलचे विविध शहरांमध्ये अनेक आऊटलेट्स आहेत. २०१७ मध्ये, सॉल्ट बे चा स्वयंपाक करतानाच्या पद्धतीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर तो प्रसिध्दी झोतात आला. यानंतर तो खूप प्रसिद्ध झाला. मेस्सी, क्रिस्टियानो रोनाल्डो आणि डेव्हिड बेकहॅमसह अनेक वर्तमान आणि माजी फुटबॉलपटूंनी सॉल्ट बेच्या रेस्टॉरंटमध्ये जेवण केले आहे.

नोव्हेंबरमध्ये, विश्वचषकादरम्यान, त्याने फिफा अध्यक्ष जियानी इन्फँटिनो यांना मिठी मारतानाचा व्हिडिओ पोस्ट केला होता. ब्राझीलच्या दिग्गज रोनाल्डो, रॉबर्टो कार्लोस आणि काफू यांच्यासोबतच्या सामन्यादरम्यान तो नंतर व्हीआयपी सीटवर दिसला. अर्जेंटिनाने फायनल जिंकल्यानंतर सॉल्ट बेला मेस्सीसोबत सेलिब्रेशन करायचे होते, पण मेस्सीने त्याच्याकडे दुर्लक्ष केले होते.

काय सांगतात फिफाचे नियम

फिफाचे नियम सांगतात की, निवडक लोकांकडे चषक दिला जातो यांमध्ये स्पर्धेचे विजेते, फिफाचे अधिकारी आणि अध्यक्षांचा समावेश आहे

हेही वाचा;

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news