Encounter in UP: ‘इतर गुंड आणि गुन्हेगार धडा घेतील’; यूपी एन्काउंटरमधील मयत आरोपीच्या आईचे वक्तव्य

mother of Ghulam who was killed in the encounter
mother of Ghulam who was killed in the encounter

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : उत्तर प्रदेशमधील माफिया आणि उमेश पाल हत्‍या प्रकरणातील आरोपी अतीक अहमद याचा मुलगा असद हा पोलिस एन्काउंटरमध्ये मारला गेला. दरम्यान असदचा साथीदार गुलाम हा देखील पोलिस चकमकीत ठार झाला. एन्काउंटर झालेला शूटर गुलाम मोहम्मदच्या आईने मोठे वक्तव्य केले आहे. "सरकारने केलेली कारवाई पूर्णपणे योग्य आहे. सर्व गुंड आणि गुन्हेगार यातून धडा घेतील, असे गुलाम मोहम्मदची आई खुसनुदा हिने माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.

गुलाम मोहम्मदच्या आईने पुढे म्हटले आहे की, मला कल्पना नव्हती की. माझा मुलगा गुलाम हा गुंड अतिक अहमदसाठी काम करायचा. मी त्याचा मृतदेह स्वीकारणार नाही. कदाचित त्याच्या पत्नीलाच गुलामचा मृतदेह मिळेल. यूपी सरकारने केलेली ही कारवाई पूर्णपणे योग्य असून, इतर गुंड आणि गुन्हेगार देखील या घटनेतून धडा घेतील; असे देखील खुसनुदा यांनी म्हटले आहे.

असदला दोन गोळ्या तर गुलामला फक्त एक गोळी लागली

चकमकीत मारले गेलेले गुंड अतिक अहमदचा मुलगा असद आणि त्याचा साथीदार गुलाम यांचे मृतदेह झाशी येथील महाराणी लक्ष्मीबाई वैद्यकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी काल आणण्यात आले. दरम्यान वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. असदला दोन गोळ्या लागल्या होत्या तर गुलामला फक्त एक गोळी लागली होती. येथे आणण्यापूर्वी 1.30 ते 2 तास आधी त्यांचा मृत्यू झाला आहे. दोघांच्याही मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे, अशी माहिती झाशी मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. नरेंद्र सेंगर यांनी दिली आहे.

अशी झाली चकमक

प्रयागराज येथे २४ फेब्रुवारी २०२३ रोजी उमेश पाल यांची हत्‍या झाली होती. तेव्‍हापासून असद आणि शूटर गुलाम मोहम्मद हे फरार झाले होते. उत्तर प्रदेश पोलिसाचे विशेष कृती दल ( एसटीएफ ) या दोघांच्‍या मागावर होती. पथकाला दोघेही झाशी येथे असल्‍याची गोपनीय माहिती मिळाली होती. पोलिसांनी त्‍यानुसार सापळा लावला. पोलिसांनी दोघांना शरण येण्‍याचे आवाहन केले. यावेळी दोघांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी दिलेल्‍या प्रत्‍युत्तरात दोघेही ठार झाले. दरम्‍यान, प्रयागराज न्‍यायालयात अतिकची सुनावणी सुरु असतानाच चकमकीची बातमी आली समोर आल्‍याने उत्तर प्रदेशमध्‍ये मोठी खळबळ माजली आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news