अरविंद केजरीवाल : ‘पंजाबमध्ये भल्याभल्यांच्या खुर्च्या हलल्या, आम आदमीला आव्हान देऊ नका’

Arvind Kejriwal and Manish Sisodia : Aam Aadmi Party
Arvind Kejriwal and Manish Sisodia : Aam Aadmi Party

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन : पंजाबचा निकाल हा सर्वात मोठा इन्कलाब आहे. पंजाबमध्ये दिग्गजांच्या खुर्च्या हलल्या आहेत. पंजाबच्या जनतेनं कमाल केली, असे गौरवोद्गार काढत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाबच्या जनतेचे आभार मानले. यावेळी त्यांच्यासोबत आप नेते मनीष सिसोदिया होते.

अरविंद केजरीवाल म्हणाले, Punjab waalo tussi kamaal kar ditta भगतसिंह यांचं स्वप्न पूर्ण होत आहे. आजवरच्या सत्ताधाऱ्यांनी जनतेला जाणूनबुजून गरीब ठेवलं. पण, 'आप'नं बदल सुरू केला आहे.काँग्रेस आणि अकाली दल या दोन्ही पक्षांचा धुव्वा उडाला आहे. भाजप पंजाबमध्ये काँग्रेसला पर्याय उभा राहू शकतो हे सूत्र अयशस्वी ठरलं आहे.

पंजाबमध्ये मोठ्या नेत्यांचा पराभव झाला. सर्वसामान्यउमेदवारांनी दिग्गजांना मात दिली. दहशतवादी मी नव्हे, देश लुटणारे दहशतवादी तुम्ही आहात असे सडेतोड उत्तर केजरीवाल यांनी विरोधकांना दिले. विरोधकांनी कजेरीवाल यांना दहशतवादी म्हटले होते. आता केजरीवाल यांनी त्यांना समर्पक उत्तर दिले आहे.

केजरीवाल पुढे म्हणाले, असा भारत बनवू, जिथे सर्व सुविधा असतील. एका मोबाईल दुकानात मोबाल रिपेअरीचं काम करणाऱ्या व्यक्तीने चरणजीत चन्नी यांना पराभूत केलं. त्या व्यक्तीची आई सरकारी शाळेत सफाई कर्मचारी आहे. वडील शेतात मजुरी करतात.

आधी दिल्ली, आता पंजाब आणि मग संपूर्ण देश इन्कलाब होणार. महिलांना आम आदमी पक्षात येण्याचं आव्हानही 'आप'ने यावेळी केलं. ते म्हणाले, आम आदमीला आव्हान देऊ नका. केजरीवाल यांनी भारत माता की जय आणि इन्कलाब जिंदाबाद अशा घोषणा दिल्या. 'केजरीवाल देशभक्तचं' हेआजच्या निकालातून जनतेनं दाखवून दिलं आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news