सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. (Aryan Drug Case) मुंबई क्रुझवरील ड्रग्ज पार्टीतून (Aryan Drug Case) एनसीबीने त्याच्यासह अन्य काही जणांना अटक केलीय. आतापर्यंत सलग पाच वेळा आर्यनच्या जामीनावर सुनावणी झाली आहे. तरीपण, अद्याप त्याला जामीन मिळालेला नाही. दरम्यान, आर्यन खानने जेलमधील जेवण जेवण्यास नकार दिलाय.
काल दि. १४ रोजीही त्याला जामीन मिळाला नाही. त्यामुळे पुढील ५ दिवस त्याला कोठडीत राहावं लागणार आहे. २० ऑक्टोबरला पुन्हा सुनावणी होईल.
शनिवार २ ऑक्टोबर रोजी मुंबईहून गोव्याकडे निघालेल्या क्रूझवर एनसीबीने छापा टाकला. या छापेमारीदरम्यान एनसीबीने आर्यनसह ८ जणांना ताब्यात घेतले होते. चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली. कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.
गेल्या ८ ऑक्टोबरपासून आर्यन हा ऑर्थर रोड जेलमध्ये आहे. आर्यन खानला जामीन मिळावा, यासाठी वकिलांकडून प्रयत्न सुरु आहेत. आतापर्यंत सलग पाच वेळा आर्यनच्या जामीनावर सुनावणी झालीय. पण त्याला जामीन मिळाला नाही.
मीडिया रिपोर्टनुसार, ज्या दिवशी आर्यनला आर्थर रोड जेलमध्ये आणण्यात आले, त्या दिवसापासून त्याने जेलमधील जेवण खाल्लेले नाही. गेल्या पाच दिवसांपासून तो फक्त बिस्किट खाऊन दिवस काढतोय. जेलमध्ये जाण्यापूर्वी पाण्याच्या १२ बाटल्या त्याने खरेदी केल्या होत्या. तेचं पाणी तो तोय. जेलमधील पाण्याला तो हात लावत नाही. आता तेही पाणी संपत आल्याच समजतंय. पण, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
दरम्यान , कोर्टात खानच्या वकिलाने जामीनसाठी बाजू मांडली. यादरम्यान, त्यांनी शौविक चक्रवर्तीच्या प्रकरणाचा हवाला देला. चार्जशीट सादर केल्यानंतर तत्काळ शौविकला जामीन मिळाला होता. त्यामुळे आर्यनलाही जामीन मिळायला हवा, असे वकिलाने सांगितले.
दरम्यान, भावाला अटक झाल्याचे समजताचं त्याची बहिण सुहाना खान भारतात येण्यास निघाली होती. ती सध्या परदेशात आहे. पण, तिला शाहरुख-गौरीने भारतात येण्यास नकार दिलाय. भावाची परिस्थिती पाहता सुहाना खानची प्रकृती बिघडल्याचे समजतेय.