कोल्‍हापूर : कडाकण्या करताना आला आडवा; पतीची लाटण्याने धुलाई - पुढारी

कोल्‍हापूर : कडाकण्या करताना आला आडवा; पतीची लाटण्याने धुलाई

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा :  नवरात्रौत्सव हा स्त्रीशक्तीचा सण म्हणून ओळखला जातो. मात्र पत्नीच्या शक्तीचा महिमा एका पतीदेवाला पाहायला मिळाला. या प्रकरणात पतीदेवाला लाटण्याचा प्रसाद खाण्याची वेळ आली. पतीची लाटण्याने धुलाई झाल्‍याचे हे प्रकरण इतक्‍यावरच थांबले नाही, तर या प्रकरणाची थेट पोलिस स्‍टेशन मध्ये नोंदही झाली. पतीची लाटण्याने धुलाई झाल्‍याची जोरदार चर्चा सर्वत्र सुरू आहे.

त्‍याच झालं अस की, पत्‍नी कडाकणी करत होती. यावेळी तीला या कामात वारंवार अडथळे आणणार्‍या या पतीदेवाला लाटण्याचा प्रसाद खाण्याची वेळ आली. प्रकरण थेट पोलिसांत आले असून, याची नोंदही झाली आहे.

  • दिवसभराचे काम आटोपून पत्नी रात्री कडाकण्या करत होती. याचवेळी पतीकडून पत्‍नीकडे सोफासेटवरील सर्व साहित्य हटविण्याची मागणी सुरू होती. आधीच दिवसभरात घरातले काम आटोपून पत्‍नी कडाकणी करण्यासाठी धडपडत असताना पतीकडून इकडे साहित्‍य पडले आहे. तिकडे साहित्‍य पडल्‍याची तक्रार सुरू होती.
  • कोल्हापूरच्या शाही दसर्‍याची शान ; वैशिष्ट्यपूर्ण ‘मेबॅक’ @ ८५

कामामुळे इतरत्र पडलेल्या पसार्‍यावरून पतीकडून टोमणे ऐकून पत्नीचा पारा चांगलाच चढला. तिने मी काय करतेय दिसत नाही का? अशी विचारणा करत तिने पोळपाट, लाटण्याचा प्रसाद पतीला दिला. यामध्ये पती किरकोळ जखमी झाला.

विजयेशु दसरा

Back to top button