पिंपरी : डोरेमॉन, मोटू-पतलूच्या राख्या खाताहेत भाव

पिंपरी : डोरेमॉन, मोटू-पतलूच्या राख्या खाताहेत भाव
Published on
Updated on

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : राखी पौर्णिमा सण अवघ्या चार दिवसांवर आला आहे. या सणानिमित्त राखी खरेदीसाठी पिंपरी बाजारेपेठेमध्ये महिलावर्गाची मोठी गर्दी दिसून येत आहे. यंदा राखी पौर्णिमेनिमित्त बाजारेपेठेत विविध रंगांच्या, आकाराच्या, छोट्या मण्यांनी सजविलेल्या राख्या खरेदीसाठी दुकानात उपलब्ध असल्याचे दिसून येत आहे. विशेषकरून कार्टूनच्या राख्यांना मोठी पसंती असल्याचे दिसून येत आहे.

राख्यांमध्ये अनेक प्रकार उपलब्ध आहेत. लहानग्या भावाला आवडेल अशी कार्टूनची राखी घेण्याकडे बहिणींचा कल दिसून येत आहे. तसेच बारीक मण्यांचा वापर करून तयार केलेल्या राख्यांनाही मागणी दिसून येत आहे. कार्टूनच्या राख्यांना लहान मुलांकडून पसंती दिली जाते आहे. त्यामध्ये डोरेमॉन, छोटा भीम, मोटू पतलू, लाईट असलेल्या राख्या लहान मुलांच्या आवडीच्या बनविलेल्या दिसून येत आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news