Donald Trump : अमेरिकेची आण्विक गुपितेही ट्रम्प यांच्या घरात

Donald Trump : अमेरिकेची आण्विक गुपितेही ट्रम्प यांच्या घरात
Published on
Updated on

वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदावर असताना राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित कागदपत्रे मुद्दाम स्वत:कडे बाळगण्यासह डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यावरील 37 आरोप सार्वजनिक करण्यात आले आहेत. त्यापैकी 31 आरोप हे राष्ट्रीय सुरक्षेशी निगडित आहेत. ट्रम्प यांनी देशाच्या आण्विक गोपनीयतेशी निगडित कागदपत्रेही आपल्या घरात ठेवलेली होती, असा गंभीर ठपकाही या 49 पानी आरोपपत्रातून त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

खोटे बोलणे, कागदपत्रे दडवणे, तपासात अडथळा आणणे, असे आरोपही ट्रम्प (Donald Trump) यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. ट्रम्प यांना या प्रकरणात अटक शक्य आहे; मात्र सरकारकडून तसे काहीही स्पष्ट करण्यात आलेले नाही.

ट्रम्प (Donald Trump)यांनी ही कागदपत्रे त्यांच्या स्टोअर रूम, बेडरूम आणि बाथरूममध्ये लपवून ठेवली होती. फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनच्या गतवर्षीच्या तपासकार्यात अडथळे यावेत म्हणून फाईल्स लपविणे, नष्ट करणे, असे प्रकारही ट्रम्प यांनी केल्याचा ठपकाही या आरोपपत्रातून ठेवण्यात आला आहे. अमेरिकेच्या इतिहासात एखाद्या माजी राष्ट्राध्यक्षांवर अशा स्वरूपाचे आरोप होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

ट्रम्प यांच्या घरात…

  • 9 गोपनीय फाईल्स आढळल्या
  • 21 अतिगोपनीय फाईल्स सापडल्या
  • 337 सरकारी कागदपत्रे जप्त झाली
  • 9 कागदपत्रे गुप्तहेर विभागाशी निगडित
  • 2020 मधील एक फाईल तर आण्विक कार्यक्रमाची

पुढे काय?

  • मियामी न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी नियोजित
  • या गंभीर आरोपांनंतरही आगामी अध्यक्षीय निवडणुकीतील ट्रम्प यांच्या उमेदवारीला कुठलाही कायदेशीर धोका नसेल.
  • दाखल प्रकरणात ते दोषी ठरले, तरीही त्यांना राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवता येणार आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांना एका फौजदारी खटल्यात वाढदिवसाच्या एक दिवस आधी म्हणजे, 13 जून रोजी दुपारी 3 वाजता मियामी येथील फेडरल कोर्ट हाऊसमध्ये हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.

अधिक वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news