नवी दिल्ली; वृत्तसंस्था : म्यानमार, बांगला देश, श्रीलंका, पाकिस्तानातील बंदरांवर तळ ठोकल्यानंतर चीनने दिएगो गार्सिया बेट गिळंकृत करण्याचा डाव रचलेला आहे. भारताला हिंदी महासागरात (Indian Ocean) सर्व बाजूंनी घेराव घालण्याची तयारी चीनने चालविलेली असतानाच, भारतीय नौदलानेही 'ड्रॅगन'ला धडकी भरावी म्हणून शनिवारी अरबी समुद्रात आजवरचा सर्वात मोठा युद्धसराव केला. (Indian Navy)
चीनच्या हिंदी महासागरातील (Arabian Sea) आव्हानाला कुठल्याही क्षणी यशस्वीपणे तोंड देण्यास भारत सज्ज असल्याचे या युद्धसरावाने दाखवून दिले. (Indian Navy)
नौदलाने पहिल्यांदाच आपल्या 'आयएनएस विक्रमादित्य' (INS Vikramaditya) आणि 'आयएनएस विक्रांत' (INS Vikrant) या दोन्ही विमानवाहू युद्धनौका (two aircraft carriers) एकत्रपणे समुद्रात सोडल्या. (Indian Navy)
सरावात 'मिग-29 के' (MiG-29K fighter) सह 35 लढाऊ विमाने (35 combat planes) उडवण्यात आली. पाणबुडीची चाचणीही घेतली. हेलिकॉप्टर्सचाही समावेश सरावात होता. 'एमएच 60 आर', 'कामोव', 'सी-किंग', 'चेतक' आणि 'एएलएच' या हेलिकॉप्टर्सनी देखणे उड्डाण केले.
युद्धनौकांवरून लढाऊ विमानांनी रात्रीदेखील उड्डाणे घेतली. सरावादरम्यान 'आयएनएस विक्रांत' या विमानवाहू जहाजावर 'रोमिओ हेलिकॉप्टर' (MH 60 'Romeo' (MH 60R) helicopter) उतरतानाचे द़ृश्य तर केवळ डोळे दीपवून टाकणारे होते. 'आयएनएस विक्रांत'च्या डेकवर नेव्हल फायटर जेट 'मिग-29 के'चे नाईट लँडिंगही करण्यात आले.
अधिक वाचा :