Coal Production देशांतर्गत कोळसा उत्पादनात २८ टक्क्यांची वाढ, देशात मुबलक कोळसा साठा उपलब्ध

Coal Production देशांतर्गत कोळसा उत्पादनात २८ टक्क्यांची वाढ, देशात मुबलक कोळसा साठा उपलब्ध
Published on
Updated on

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
देशात २०२१-२२ मध्ये ७७७ दशलक्ष टन (एमटी) विक्रमी कोळसा उत्पादन झाल्यानंतर चालू आर्थिक वर्षातही देशांतर्गत कोळसा उत्पादन वाढले आहे. २१ मे २०२२ पर्यंत २०२२-२३ मधील एकूण स्थानिक कोळसा उत्पादन १३७.८५ मेट्रिक टन घेण्यात आले. मागीलवर्षी याच काळात हे उत्पादन १०४.८३ मेट्रिक टन एवढे होते. कोळसा उत्पादनात यंदा २८.६ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आल्याचे कोळसा मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

आर्थिक वर्षात कोळसा उत्पन्नाचे ध्येय हे ९११ मेट्रिक टन

जून महिन्यात देखील कोळसा उत्पादनात वाढ नोंदवण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षात कोळसा उत्पन्नाचे ध्येय हे ९११ मेट्रिक टन निश्चित करण्यात आले असून, गतवर्षीच्या तुलनेत हे प्रमाण १७.२ टक्क्यांनी अधिक आहे. देशांतर्गत कोळसा आधारित (डीसीबी) ऊर्जा प्रकल्पांद्वारे मिश्र वापर करण्यासाठी २०२१-२२ मध्ये कोळसा आयात ही ८.११ मेट्रिक पर्यंत घसरली आहे, जी गेल्या आठ वर्षांमधील सर्वात कमी कोळसा आयात ठरली.

विविध खाणींमध्ये ५२ मेट्रिक टनपेक्षा अधिक कोळशाचा साठा

देशांतर्गत स्रोतांकडून झालेला ठोस कोळसा पुरवठा आणि वाढत्या कोळसा उत्पादनामुळे शक्य झाल्याचे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. देशांतर्गत विविध कोळसा खाणींमध्ये कोळशाचा साठा ५२ मेट्रिक टनपेक्षा अधिक आहे. हा साठा वीज प्रकल्पांची पुढील २४ दिवसांची गरज पुर्ण करेल. या व्यतिरिक्त सुमारे ४.५ मेट्रिक टन कोळशाचा साठा हा विविध गुडशेड साइडिंग्ज, खासगी वॉशरिज आणि बंदरांवर उपलब्ध आहे आणि तो ऊर्जा प्रकल्पांमध्ये नेण्याच्या प्रतीक्षेत असल्याचे मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news