Dolphins in Amazon : ॲमेझॉनचे तापमान विक्रमी पातळीवर; १०० हून अधिक डॉल्फिनचा मृत्यू

Dolphins in Amazon
Dolphins in Amazon

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाश्चात्य देशांमध्ये तापमानाने विक्रमी पातळी गाठली आहे. ब्राझीलला यावर्षी विक्रमी उच्च तापमानाचा सामना करावा लागत आहे. सर्वसामान्यांसोबतच पशु-पक्ष्यांनाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याचा परिणाम ॲमेझॉन शहरातही जाणवत झाले. परिणामी येथील अ‍ॅमेझॉन नदीच्या पाण्यावरही झाला असून पाण्याच्या तापमानात विक्रमी वाढ झाली आहे. यामुळे गेल्या सात दिवसांत अ‍ॅमेझॉन नदीतील १०० हून अधिक डॉल्फिन मृतावस्थेत आढळून आले आहेत. (Dolphins in Amazon)

संबंधित बातम्या:

Dolphins in Amazon: पाण्यातील अनेक जीवांना धोका

अ‍ॅमेझॉन नदीच्या पाण्याचे तापमान 103 अंश फॅरेनहाइट नोंदवले गेले आहे. ब्राझीलच्या मामिरोआ संस्थेच्या म्हणण्यानुसार, टेफे तलावात डॉल्फिन मृतावस्थेत आढळले आहेत. दरम्यान येथील एका संस्थेने ही घटना अ‍ॅमेझॉनमधील दुष्काळ आणि वाढते तापमान याचा परिणाम असल्याचे म्हटले आहे. या तापमान वाढीच्या समस्येमुळे डॉल्फिनसह अनेक पाण्यातील परिसंस्था आणि जीव धोक्यात येण्याची अधिक शक्यता आहे. (Dolphins in Amazon)

नेमके उत्तर देणे घाईचे ठरेल- मामिरोआ संस्था (ब्राझील)

ब्राझीलमधील मामिरोआ संस्थेने म्हटले आहे की, डॉल्फीनच्या मृत्यूंचे नेमके उत्तर देणे खूप घाईचे ठरेल. दरम्यान तज्ज्ञांनी स्पष्ट केल्यानुसार, हे निश्चितपणे दुष्काळ आणि टेफे तलावातील उच्च तापमानाशी संबंधित आहे, असेही संस्थेने सांगितले आहे.

डॉल्फिन वाचवण्यासाठी मोहीम सुरू

एका अहवालानुसार, संशोधक आणि शास्त्रज्ञ तलाव आणि तलावातून जिवंत डॉल्फिन बाहेर काढत आहेत. तसेच त्यांना वाचवण्यासाठी सुरक्षितपणे नदीत सोडले जात आहे. येथील नदीतील येथील पाणी इतर ठिकाणांच्या तुलनेत थोडे थंड आहे. मात्र, ही दोन्ही ठिकाणे खूप दूर आहेत. यामुळे डॉल्फिनना स्थलांतर करणे हे अवघड आहे.

व्हायरसची चाचणी करणे गरजेचे

मामिरोआ इन्स्टिट्यूटचे संशोधक आंद्रे कोएल्हो यांनी म्हटले आहे की, अशा डॉल्फिनला इतर नद्यांमध्ये स्थानांतरित करणे सुरक्षित नाही. त्यांना इतरत्र पाठवण्यापूर्वी तेथे विषाणू आहे का ते तपासले पाहिजे. दरम्यान किमान ५९ नगरपालिकांनी अमेझॉनमध्ये सरासरीपेक्षा कमी पाण्याची पातळी नोंदवली आहे, त्यामुळे नदीतील मासेमारीची कामे खोळंबली आहेत, असे देखील अहवालात म्हटले आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news