Mumbai News : सीएनजीच्या दरात ३, तर पीएनजीमध्ये २ रुपयांची कपात | पुढारी

Mumbai News : सीएनजीच्या दरात ३, तर पीएनजीमध्ये २ रुपयांची कपात

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  महागाईने त्रस्त झालेल्या नागरिकांना थोडाफार दिलासा मिळणार आहे. महानगर गॅसने सीएनजी आणि पीएनजीच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. सीएनजी प्रतिकिलो ३ रुपये, तर पीएनजीच्या दरात २ रुपयांची कपात केली आहे. सोमवार, दि. २ ऑक्टोबरपासून हा नवा दर लागू होणार आहे..

हा निर्णय मुंबई आणि आसपासच्या परिसरात लागू होणार आहे. त्यामुळे मुंबईत आता प्रतिकिलो सीएनजीसाठी ७६ रुपये, तर पीएनजीकरिता ४७ रुपये मोजावे लागणार आहेत. यापूर्वी ८ एप्रिल रोजी सीएनजी-पीएनजीच्या दरात कपात करण्यात आली होती. देशांतर्गत उत्पादित नैसर्गिक वायूच्या किमती कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यानंतर महानगर गॅसने सीएनजी आणि पीएनजीच्या दरांमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला. या कपातीमुळे नैसर्गिक वायूच्या वापरास प्रोत्साहन मिळून विशेषतः घरगुती आणि वाहतूक क्षेत्रात नैसर्गिक वायूचा वापर वाढेल, असा विश्वास महानगर गॅसने व्यक्त केला.

Back to top button