Karnataka : शिवमोग्गात टिपू सूलतानच्या पोस्टरवरुन दगडफेक; ४ जखमी, कलम १४४ लागू | पुढारी

Karnataka : शिवमोग्गात टिपू सूलतानच्या पोस्टरवरुन दगडफेक; ४ जखमी, कलम १४४ लागू

पुढारी ऑनलाईन डेस्क : कर्नाटकातील शिवमोग्गा येथे रविवारी (दि.१) ईद-ए- मिलाद मिरवणुकीत दोन गटात दगडफेक झाली. टिपू सूलतानच्या पोस्टरवरुन येथे तणाव निर्माण झाला. यामुळे हिंसाचार उसळला आणि तणाव निर्माण झाला. मिरवणुकीदरम्यान सहभागींमध्ये झालेल्या जातीय हिंसाचाराच्या घटनेत ४ जण जखमी झाले. दरम्यान खबरदारीचा उपय म्हणून शिवमोग्गामधील रागीगुड्डा भागात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. असे वृत्त ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने दिले आहे. (Karnataka)

शिवमोग्गा येथील रागीगुड्डा-शांती नगर येथे शहराच्या बाहेरील काही मुस्लिम तरुणांनी तत्कालीन म्हैसूर राज्याचे शासक टिपू सुलतान यांचे मोठे पोस्टर उभारले होते. दरम्यान, उजव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांनी यावर आक्षेप घेतला. या कार्यकर्त्यांनी चित्रात टिपू सुलतान एका हिंदू योद्ध्याला मारताना दाखवल्याचा आरोप उजव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांनी केला. यानंतर मिरवणुकी दरम्यान दोन गटात दगडफेक झाली. दरम्यान तणाव वाढत असताना, दोन गटांना पांगवण्यासाठी पोलीस कर्मचार्‍यांसह परिसरात अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तसेच घटना घडलेल्या रागीगुड्डा भागात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. (Karnataka)

शिवमोग्गा एसपी जीके मिथुन कुमार यांनी हा वाद मिटवण्यासाठी दोन्ही समुदायातील नेत्यांशी संपर्क साधला. तसेच शांततेत ईद -ए- मिलाद साजरी करण्यासाठी तरुणांना आवाहन त्यांनी केले. परिस्थिती आणखी वाढू नये यासाठी एसपींनी आयोजकांना पोस्टर पडद्याने झाकण्याची सूचना देखील केली, असे वृत्तात पुढे म्हटले आहे. (Karnataka)

हेही वाचा:

Back to top button