मुलगी झाली हो फेम माऊ साजिरीचा नवा लूक व्हायरल झाला आहे. एरव्ही साधी, सालस दिसणारी माऊ खऱ्या आयुष्यात मात्र खूप ग्लॅमरस आहे. माऊचं खरं नाव दिव्या सुभाष असं आहे. (Divya Subhash) तिचा नवा लूक पाहल्यानंतर तुम्हाला अजिबात पटणार नाही की ही माऊ आहे! मालिकेत निरागस मुलीची भूमिका साकारून तिने सर्वांचीच मनं जिंकली. ती आपल्या कुटुंबासाठी धडपड करत असते. तिला बोलता येत नाही. पण, हावभाव, इशाऱ्याद्वारे ती आपल्या मनातील भावना व्यक्त करते. (Divya Subhash)
दिव्याचा जन्म २१ जुलै रोजी मुंबईत झाला. तिने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलंय. ती एक उत्तम नृत्यांगना आहे. सोशल मीडियावर ती सक्रिय असते. दिव्याचे इन्स्टावर 195k followers आहेत. तिने तिच्या इन्स्टावर काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंना भरभरून कमेंट्स मिळताहेत. एका चाहत्याने तिला कमेंट दिलीय की, एकदम कडक मनी माऊ❤️❤️❤️❤️
माऊने आणखी कीही फोटो शेअर केले आहेत. त्या फोटोला तिने कॅप्शन लिहिलीय की-मेरी झुकी नज़र, मेरी हर अदा तुझे कह रही है ये दास्तां…✨♥️आणखी एक फोटो शेअर करत तिने शुभ दिपावली अशी कॅप्शन दिलीय.
माऊ पिरेम या नव्या चित्रपटातून भेटीला येणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत विश्वजीत विठ्ठल पाटील हा अभिनेता मुख्य भूमिकेत असणार आहे. या चित्रपटाच्या शिर्षकावरून ही एक लव्हस्टोरी असल्याचे समजते. या चित्रपटात अनेक कलाकारांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
'पिरेम' चित्रपटाचा नुकताच टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. पर्व फिल्म्स प्रस्तुत 'पिरेम" या चित्रपटाच्या टीझरमध्ये प्रेमाच्या निरनिरळ्या छटा दाखवण्यात आल्या आहेत. या चित्रपटातील खास म्हणजे, नवीन कलाकारांची जोडी रूपेरी पडद्यावर पदार्पण करणार सज्ज झाली आहे. या टीझरने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
पर्व फिल्म्स प्रस्तुत पिरेम" या सिनेमाचे निर्मिता विश्वजीत विठ्ठल पाटील यांनी केली असून दिग्दर्शक प्रदीप रंगराव लायकर यांनी केलं आहे. तर सुप्रसिद्ध संगीतकार जोडी रोहन-रोहन यांनी या सिनेमाला संगीत दिले आहे. ३ डिसेंबर २०२१ रोजी हा सिनेमा प्रदर्शित करण्यात येणार आहे.
असोसिएट डिरेक्टर विजय केरबा आणि सह दिग्दर्शन धीरज पोवार, मृगया केणी यांनी केलं आहे. या चित्रपटाचे 'मन झाले…' हे पहिलं गाणे उद्या चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.