Divya Bharti : ५ व्या मजल्यावरून पडली होती ‘ही’ अभिनेत्री

divya-bharti
divya-bharti
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन

साजिद आणि दिव्या भारतीचं प्रेम १९९० मध्ये चित्रपट शोला आणि शबनमच्या सेटवर सुरू झालं. गोविंदा – दिव्या (Divya Bharti) फिल्म सिटीमध्ये या चित्रपटाचे शूटिंग करत होते. प्रत्येकजण घायाळ होईल, असं दिव्याचं सौंदर्य होतं. साजिदनेदेखील जेव्हा  दिव्याला पाहिले तेव्हा तोदेखील तिच्या प्रेमात पडला. साजिद आणि दिव्याची प्रेम कहाणी सुरू झाली. पण, कुणाला माहित होतं, ही प्रेम कहाणी अधुरी राहिल! दिव्या भारती, ही बॉलिवूडला मिळालेली सौंदर्याची देणगी होती. आपल्या अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर तिनं प्रत्येकाला वेड केलं. पण, याच अभिनेत्रीला दुर्देवाने जेव्हा आपले प्राण गमवावे लागले, तेव्हा अख्खा देश हळहळला. आज २५ फेब्रुवारीला तिचा जन्मदिवस. (Divya Bharti)

divya bharti
divya bharti

साजिद यांच्या माहितीनुसार, दिव्याने लग्नासाठी हट्ट केला होता आणि तेही लवकर! एका मुलाखतीत त्याने सांगितलं होतं की, दिव्याने त्याला १५ जानेवारी, १९९२ रोजी लग्न करण्याची विनंती केली होती. साजिद आणि दिव्याने १० मे, १९९२ ला वर्सोवामध्ये एका अपार्टमेंटमध्ये एक खासगी समारंभ करून लग्न केलं होतं.

divya bharti
divya bharti

१९९३ मध्ये दिव्याचे तीन हिंदी चित्रपट प्रदर्शित झाले होते. क्षत्रिय, रंग आणि शतरंज असे ते चित्रपट होते. यापैकी दोन चित्रपट तिच्या मृत्यूनंतर रिलीज झाले.

साजिदने खासगीमध्ये लग्न करण्यामागचं कारण सांगितलं होतं की-दिव्याने खूप कमी वयात लग्न केलं होतं. आणि ती तिच्या करिअरच्या यशाच्या शिखरावर होती. तिचं वैवाहिक आयुष्य केवळ १ वर्षामध्ये संपलं. ५ एप्रिल, १९९३ मध्ये तथाकथित आपल्या इमारतीच्या ५ व्या मजल्यावरून पडून तिचा दुर्दैवी अंत झाला होता. या प्रकरणासाठी तिचा पती साजिदलादेखील जबाबदार ठरवण्य़ात आल. पण, पुराव्यांभावी ही केस बंद करण्यात आली.

divya bharti
divya bharti

काय घडलं त्यादिवशी?

मुंबईतील वर्सोवा भागात अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावर दिव्या तिच्या पतीसह राहत होती. तिच्या घरी तिची मैत्रीण आणि एक प्रसिद्ध फॅशन डिझायनरही भेटायला आली होती. तिघेही लिव्हिंग रुममध्ये बसून गप्पा मारत होते. दिव्याची मोलकरीण स्वयंपाकघरात गेली होती. दिव्या हॉलच्या खिडकीच्या दिशेने गेली. तिथूनचं ती मोलकरीणशी मोठ्या आवाजात बोलत होती. दिव्याच्या लिव्हिंग रुममध्ये बाल्कनी नव्हती. खिडकीलादेखील ग्रिल नव्हते. या खिडकीखाली पार्किंगची जागा होती.

divya bharti
divya bharti

कुणालाही पुसटशी कल्पना नव्हती…

असं म्हटलं जातं की, खिडकीत गेल्यानंतर दिव्या नीट उभे राहण्याचा प्रयत्न करत होती. पण, ती सरळ खाली पडली.. ती इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून खाली पडली होती. तिला रुग्णालयात नेण्यात आले. पण, डोक्याला दुखापत आणि अंतर्गत रक्तस्रावामुळे तिचा मृत्यू झाल्याचे म्हटलं गेलं.

divya bharti
divya bharti
divya bharti
divya bharti

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news