‘या’ ५ वेबसिरीज अजूनही पाहिल्या नसतील, तर आजच एका रात्रीत पाहून संपवा ! | पुढारी

'या' ५ वेबसिरीज अजूनही पाहिल्या नसतील, तर आजच एका रात्रीत पाहून संपवा !

पुढारी ऑनलाईन डेस्क : क्राइम, कॉमेडी, सस्पेन्स आणि हॉरर या सर्व प्रकारांसाठी सध्या OTT Platform वर अनेक उत्तम चित्रपट आणि वेब सीरिज आपल्याला पहायला मिळत आहेत. दिवसेंदिवस ओटीटीवर चाहत्यांची क्रेझ वाढत आहे. तुम्हाला OTT वर आपला विकेंड घालवायचा असेल तर तुमच्यासाठी या ५ सर्वोत्कृष्ट मालिकांची यादी तुम्हाला उपयोगी पडणार आहे. सध्या सोशल मीडियावर ५ वेबसीरिज धुमाकूळ घालत आहेत.

OTT Platform : TVF पिक्चर्स

TVF Pitchers ला IMDb वर 9.1 रेटींग देण्यात आले आहे. ही मालिका चार तरुणांवर आधारीत आहे. यामध्ये नवीन कस्तुरिया, अरुणाभ कुमार, जितेंद्र कुमार, अभय महाजन यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. दरम्यान याचा दुसऱ्या पार्टसाठी चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. ज्यांनी याचा पहिला सिझन पाहिला नाही त्यांनी ही सिरीज नक्कीच बघावी. ही वेबसिरीज तुम्ही MX Player वर पाहू शकता.

OTT Platform : कोटा फैक्ट्री (Kota Factory)

कोटा फैक्ट्री या वेबसिरीजला चाहत्यांनी चांगलीच पसंती दिली आहे. IMDb वर कोटा फॅक्टरीला ९.१ रेटिंग मिळाले आहे. आयआयटीमध्ये प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक तरूणाने ही वेबसिरीज नक्कीच पहावी अशी बनवण्यात आली आहे. १६ वर्षीय वैभव नावाच्या मुलावर ही वेबसिरीज बनवण्यात आली आहे.

इटारसीहून कोटा येथे JEE Mains कोचिंग क्लाससाठी वैभव जातो. यानंतर होणारे बदल यावर ही सिरीज दाखवण्यात आली आहे. राघव सुब्बू यांनी याचे दिग्दर्शन केले. त्यांचा पहिला सीझन यूट्यूबवर रिलीज झाला. या सिरीजच्या लोकप्रियतेनंतर, त्याचा दुसरा सीझन Netflix वर प्रदर्शित करण्यात आला आहे.

असुर

अर्शद वारसी आणि बरुण सोबती यांच्या या वेब सीरिजला IMDB वर ८.५ रेटिंग मिळाले आहे. या शोमध्ये पौराणिक कथांना गुन्हेगारीशी जोडून प्रेक्षकांना खेळवण्याच्या अतिशय चांगल्या पद्धतीने प्रेक्षकांसमोर मांडण्यात आला आहे. या शोची कथा खूप रंजक आहे. असुर सिरीज तुम्हाला शेवटपर्यंत गुलदस्त्यात जोडून ठेवण्यास मदत करेल. ही सिरीज Voot Select वर आपल्याला पहायला मिळेल.

मिर्झापूर

मिर्झापूरचे दोन सिझन रिलीज झाले आहेत. त्याला IMDb वर ८.५ रेट मिळाले आहे. यात पंकज त्रिपाठी, अली फजल, श्वेता त्रिपाठी, विक्रांत मॅसी आणि दिव्येंदू शर्मा यांनी भूमिका केल्या होत्या. उत्तर प्रदेशमधील मिर्झापूर शहरामध्ये असलेल्या गुन्हेगारी विषयीची गोष्ट यात दाखवण्यात आली आहे.

तुमच्या नजरेतून ही मालिका राहिली असेल तर नक्कीच पहा. या सिरीजचे दोन्ही सिझन Amazon Prime Video वर पाहू शकता. मिर्झापुरचा तिसरा सिझनही प्रेक्षकांच्या पसंतीस येणार आहे.

दिल्ली क्राइम

आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट वेब सिरीजचा पुरस्कार जिंकणाऱ्या दिल्ली क्राइमला आयएमडीबीवर ८.५ रेटिंग मिळाले आहे. रिची मेहता दिग्दर्शित ही वेबसिरीज दिल्लीतील सामूहिक बलात्काराच्या घटनेवर आधारित आहे. काही वेबसिरीजमध्ये तुम्ही आवर्जून पहावी अशी वेब सिरीज आहे. यामध्ये शेफाली शाह महिला डीसीपीच्या भूमिकेत आहे. तुम्ही ते Netflix वर पाहू शकता.

Back to top button