सुहाना-अगस्त्य साथ-साथ | पुढारी

सुहाना-अगस्त्य साथ-साथ

पुढारी ऑनलाईन

शाहरूख खानची मुलगी सुहाना आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा हे दोघे नुकतेच एकत्र दिसून आले. या दोघांचे फोटोज सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. त्यांच्यासोबत दिग्दर्शक झोया अख्तरही होती. झोया अख्तर 1960 च्या दशकातील प्रसिद्ध ‘आर्ची’ या कॉमिकवर चित्रपट की वेबसीरिज बनवत आहे. हा एक म्युझिकल ड्रामा असणार आहे. जो थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रीलिज होईल. त्यामध्ये अनेक स्टारकिड्स एकत्र दिसणार असल्याची चर्चा गेल्या काही काळापासून इंडस्ट्रीत आहे. जेव्हापासून या प्रोजेक्टची घोषणा झाली आहे तेव्हापासून विविध स्टारकिड्सच झोया अख्तरसोबत किंवा तिच्या कार्यालयाबाहेर दिसले आहेत. सुहाना, अगस्त्य नंदा आणि श्रीदेवीची द्वितीय कन्या खुशी कपूर हे तिघे याद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, शाहरूखचा मुलगा आर्यनदेखील लेखक म्हणून बॉलीवूडमध्ये पदार्पण करू शकतो.

Back to top button