Dhule News : बाभळे जलशुद्धीकरण केंद्रावर दहशतवादी हल्ला होतो तेव्हा…

Dhule News : बाभळे जलशुद्धीकरण केंद्रावर दहशतवादी हल्ला होतो तेव्हा…

धुळे ; पुढारी वृत्तसेवा-धुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुंबई आग्रा महामार्गावरील बाभळे येथील तापी पाणीपुरवठा जलशुद्धीकरण केंद्रावर आज दुपारी अचानक मोठा पोलीस फौज फाटा धडकला. या केंद्रात दोघा दहशतवाद्यांनी कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवल्याने पोलीस दल कारवाई करीत असल्याची अफवा जनतेत पसरली. त्यामुळे मुंबई आग्रा महामार्गावरून जाणाऱ्या वाहन चालकांची व शेतकरी शेतमजुरांची या केंद्राजवळ मोठी गर्दी झाली. अखेर दहशतवाद्यां समवेत दोन हात करण्याची ही जिल्हा पोलीस दलाची रंगीत तालीम असल्याचे स्पष्ट झाल्याने प्रत्येकाने सुटकेचा निश्वास सोडला.

बाभळे येथील जलशुद्धीकरण केंद्रावर आज दुपारी मोठा पोलीस फौज फाटा अचानक धडकला. त्यामुळे येथील कर्मचारी आणि महामार्गावरून जाणारे नागरिक तसेच शेतात काम करणारे शेतमजूर आणि शेतकरी यांच्यामध्ये भीती वजा कुतूहलाचे वातावरण तयार झाले . या जलशुद्धीकरण केंद्रात दोघा दहशतवाद्यांनी कर्मचाऱ्यांना पोलीस ठेवल्याची अफवा यावेळी बाहेर पसरली. पोलिसांनी देखील या दहशतवाद्यांशी दोन हात करत करण्यासाठी या केंद्राच्या परिसरात बंदोबस्त लावून एका तुकडीला केंद्रात कारवाई करण्यासाठी पाठवले. या जलशुद्धीकरण केंद्रात दोन अतिरेकी शस्त्रासह असून तेथे काम करणाऱ्या लोकांना ओलीस ठेवले असून या संदर्भात कारवाई सुरू असल्याची माहिती बाहेर सर्व ठिकाणी पसरली. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, उपाधीक्षक धनंजय पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्यासह दहशतवादी विरोधी पथक, दंगल विरोधी पथक, बॉम्ब शोधक पथक, श्वान पथक व अन्य शाखेचे कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले. यावेळी पोलीस पथकाने तातडीने जलशुद्धीकरण केंद्रातील वेगवेगळ्या मार्गाने आत प्रवेश केला. त्याचप्रमाणे नोकरीत चेहऱ्यावर काळ्या कपड्याने आवरण केलेल्या दोघांना ताब्यात घेतले. या कारवाईत एक कर्मचारी जखमी झाल्याने त्याला रुग्णवाहिकेने रुग्णालयात देखील पाठवण्यात आले.

या सर्व प्रकाराला लांबून शेतकरी शेतमजूर आणि वाहन चालक लांबून पहात होते. यावेळी जलशुद्धीकरण केंद्रावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची अफवा देखील पसरली. मात्र पोलीस पथकाने ध्वनी क्षेपकावर ही दहशतवाद्यांच्या विरोधात कारवाई करण्याची जिल्हा पोलीस दलाची रंगीत तालीम असल्याचे जाहीर केले. त्यामुळे अफवेला पूर्णविराम मिळाला. दरम्यान धुळे जिल्हा पोलीस दल कोणत्याही अप्रिय घटनेला सामोरे जाण्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचा संदेश देखील यावेळी जनतेमध्ये गेला. त्यामुळे समाधानाची प्रतिक्रिया उमटली.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news