बीड : काजळा येथे छापा टाकून २० किलो गांजा जप्त | पुढारी

बीड : काजळा येथे छापा टाकून २० किलो गांजा जप्त

धोंडराई, पुढारी वृत्तसेवा: तालुक्यातील काजळा परिसरात कपाशीच्या शेतात छापा टाकून २० किलो गांजा जप्त केला. ही कारवाई चकलांबा पोलिसांनी आज (दि.२४) दुपारी दोनच्या सुमारास केली. शेत मालक नारायण श्रीमंत डोगरे (वय ४८, रा. काजळा, ता. गेवराई, जि. बीड) याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून २ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

याबाबत अधिक माहिती अशी की, काजळा परिसरातील गट क्रं ६८ मध्ये कपाशीच्या शेतात गांजाची लागवड केल्याची गोपनीय माहिती चकलांबा पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर व उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगूरू यांच्या सुचनेनुसार चकलांबा पोलिसांनी आज छापा मारला.

ही कारवाई चकलांबा पोलीस निरीक्षक नारायण एकशिंगे, नायब तहसिलदार संजय सोनवणे, मंडळ अधिकारी दत्तात्रय शेंबडे, पोलीस उपनिरीक्षक तांगडे, पोलीस उपनिरीक्षक इंगळे, हवालदार राम बारगजे, प्रकाश खेडकर, कैलास गुजर यांनी केली.

हेही वाचा 

Back to top button