Dhanush family photo : अभिनेता धनुषचा आई-वडील, भावासोबतचा फोटो व्हायरल

dhanush family
dhanush family
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

दाक्षिणात्य अभिनेता धनुष (Dhanush family photo) याला त्याचे वैयक्तिक आयुष्य खासगीत ठेवणे आवडते. जरी तो सोशल मीडियावर सक्रिय असला तरीही तो त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित गोष्टी त्याच्या चाहत्यांशी क्वचितच शेअर करतो. आता धनुषचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये अभिनेता त्याचे आई-वडील आणि भाऊ सेल्वाराघवनसोबत दिसत आहे. धनुषचा भाऊ आणि दिग्दर्शक सेल्वाराघवनने हा फोटो पोस्ट केला आहे, जो सोशल मीडियावर देखील व्हायरल होत आहे. (Dhanush family photo)

सेल्वाराघवनने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये धनुष हाताची घडी घालून आपल्या कुटुंबीयांसोबत उभा असलेला दिसत आहे. धनुष आणि त्याचा भाऊ आणि चित्रपट निर्माते सेल्वाराघवनसोबत पुन्हा एकत्र येणार आहेत. हे दोघे आगामी 'नाने वरुवेन' या चित्रपटासाठी एकत्र काम करत आहेत. त्याचे शूटिंग सुरू आहे. चित्रपटात धनुषसोबत इंधुजा रविचंदर दिसणार आहे.

dhanush family
dhanush family

नाने वरुवेन या चित्रपटाव्यतिरिक्त अभिनेत्याचे अनेक चित्रपट येणार आहेत. यामध्ये दिग्दर्शक मिथ्रन जवाहरसोबत थिरुचितंबलम आणि दिग्दर्शक वेंकी अटालुरी यांच्यासोबत तामिळ-तेलुगू द्विभाषिक चित्रपट वाथी यांचा समावेश आहे.

दरम्यान, साऊथ अभिनेता धनुष आणि त्याची पत्नी ऐश्वर्या रजनीकांत घटस्फोटावरून चर्चेत आले होते. दोघे वेगळे झाल्यानंतर ऐश्वर्या-धनुष यांच्यात चांगली बॉन्डींग आहे. मध्यंतरी दोघांनी ट्विटरवर ट्विट करून एकमेकांशी बातचीत केली. त्यामुळे साऊथचे हे दोन्ही स्टार्स पुन्हा एकदा चर्चेत आले होते. ऐश्वर्या रजनीकांत यांचं गाणं पयानी रिलीज झालं आहे, यावर ऐश्वर्याने खूप काम केले होते.

'झुंड' च्या प्रेमात पडला होता धनुष

धनुषने झुंडचं स्क्रिनिंग पाहिल्यानंतर नागराज मंजुळेच्या कामाचं कौतुक केलं होतं. हा चित्रपट लोकांपर्यंत पोहोचलाच पाहिजे, अशी प्रतिक्रिया त्याने दिली होती. झुंड पाहिल्यानंतर धनुष देखील भारावून गेला होता. 'झुंड'चं खास स्क्रिनिंग ठेवण्यात आलं होतं. त्यावेळी चित्रपटातील सर्व कलाकारांनी त्यांच्या दमदार अभिनयाने आपले मन जिंकल्याची भावना त्याने व्यक्त केली होती. इतकेच नाही तर, नागराज मंजुळे यांचं काम प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, अशी इच्छा देखील व्यक्त केली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news