श्रुती हासनच्या बॉयफ्रेंडला शुभेच्छा! | पुढारी

श्रुती हासनच्या बॉयफ्रेंडला शुभेच्छा!

पुढारी ऑनलाईन : कमल हासन आणि सारिका यांची थोरली कन्या श्रुती दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एक स्टार व नावाजलेली गायिकाही आहे. हिंदीत तिला अद्यापही फारशी चमक दाखवता आली नसली तरी अलीकडेच ‘बेस्टसेलर’ या वेब सीरिजमधील तिच्या अभिनयाचे कौतुक झाले होते. ती सोशल मीडियातही बरीच सक्रिय असते.

वैयक्‍तिक आणि व्यावसायिक जीवनातील अनेक गोष्टी ती सोशल मीडियात शेअर करीत असते. आता तिने आपला बॉयफे्ंरड शंतनू हजारिका याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शंतनू हा आपल्या आयुष्यातील ‘देवदूत’ असल्याचे तिने म्हटले आहे. त्याच्यासमवेतची अनेक छायाचित्रेही तिने सोशल मीडियात शेअर केली आहेत. या फोटोंना अनेक चाहत्यांनीही लाईक्स केले आहे.

हेही वाचलंत का? 

 

Back to top button