ऋषी कपूर यांना गाण्यातून मानवंदना! | पुढारी

ऋषी कपूर यांना गाण्यातून मानवंदना!

पुढारी ऑनलाईन : दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांचा अखेरचा चित्रपट ‘शर्माजी नमकिन’ गुरुवारी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. त्यानिमित्ताने ऋषी कपूर यांचा मुलगा अभिनेता रणबीर कपूर व अन्य कलाकारांनी ऋषी यांच्या ‘ओम शांती ओम’ या गाजलेल्या गाण्यावर नृत्य करून त्यांना मानवंदना दिली.

हा व्हिडीओ ऋषी कपूर यांची पत्नी व अभिनेत्री नितू कपूर यांनी सोशल मीडियात शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘लव्हली ट्रिब्यूट टू कपूर साहब’. यामध्ये 1980 च्या ‘कर्ज’ चित्रपटातील सदाबहार ‘तो बोलो… ओम शांती ओम’ या गाण्यावर रणबीर, आमीर खान, आलिया भट्ट, करिना कपूर, आदर जैन, तारा सुतारिया, विकी कौशल, फरहान अख्तर, अर्जुन कपूर, अनन्या पांडे आणि सिद्धार्थ चतुर्वेदी यांनी म्युझिकल ट्रिब्यूट दिले आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button