पुढारी ऑनलाईन डेस्क : जुन्या संसद भवनात देशाच्या विकासाचे अनेक निर्णय घेतले आहेत. आज या भवनातील शेवटचा दिवस आहे, उद्यापासून नवीन संसद भवनात संसदेचे कामकाज सूरू होईल. आपल्या संसदेच्या नवीन इमारतीत आपली लोकशाही नवी उंची गाठेल, असा विश्वास लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी व्यक्त केला.
संबंधित बातम्या :
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संसदेच्या विशेष सत्रादरम्यान जी २० च्या यशस्वी आयोजनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले. पंतप्रधान मोदी यांनी जी २० मध्ये प्रस्तावित केलेल्या सुधारणांचे समर्थन केले. "जी २० चा दृष्टिकोन आता आर्थिक नसून मानवतावादी आहे. जी २० परिषदेमुळे भारताची प्रतिमा जगभरात उंचावली गेली, भारतासाठी ही गौरवशाली बाब आहे," असेही ओम बिर्ला यांनी म्हटले आहे.
हेही वाचा :