पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटो (Zomato) आणि मॅकडोनाल्डस् (McDonald's) यांना शाकाहारीऐवजी मांसाहारी पदार्थांची डिलिव्हरी करणे चांगलेच महागात पडले आहे. जोधपूरच्या ग्राहक न्यायालयाने दोन्ही कंपनींना १ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. झोमॅटोने शुक्रवारी ही माहिती दिली असून या आदेशाविरोधात झोमॅटो (Zomato) अपील करणार असल्याचेही सांगितले. (Zomato, McDonalds Fined)
संबंधित बातम्या :
ही ऑर्डर मॅकडोनाल्डद्वारे वितरित करण्यात आली होती. जिल्हा ग्राहक विवाद निवारण मंच (II) जोधपूरने ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ चे उल्लंघन केल्याबद्दल झोमॅटो (Zomato) आणि मॅकडोनाल्डस्'ला (McDonald's) १ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच कायदेशीर प्रक्रियेचा खर्च कंपन्यांना उचलावा लागेल, असेही ग्राहक न्यायालयाने म्हटले आहे. यासाठी दोन्ही कंपन्यांना ५ हजार रुपये भरण्यास सांगितले आहे. अशाप्रकारे खर्च व दंडाची रक्कम मिळून दोन्ही कंपन्यांवर १ लाख ५५ हजार रुपयांचे दायित्व आहे. न्यायालयाने दोघांनाही समान रक्कम देण्यास सांगितले आहे. म्हणजेच दोघांना ५२ हजार ५०० रुपये द्यावे लागतील.
झोमॅटोने सांगितले की, वकिलांच्या सल्ल्यानुसार या आदेशाविरुद्ध अपील दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. झोमॅटोच्या (Zomato) मते, ग्राहक आणि कंपनी यांच्यातील संबंध नियंत्रित करणाऱ्या सेवा अटी स्पष्टपणे सांगतात की ते (Zomato) खाद्यपदार्थांच्या विक्रीसाठी केवळ एक सुविधा देणारे व्यासपीठ आहे. सेवेतील कोणतीही कमतरता, ऑर्डरचे चुकीचे वितरण आणि गुणवत्तेसाठी रेस्टॉरंट जबाबदार आहे.
हेही वाचा :