Zomato CEO : सरत्या वर्षी झोमॅटोच्या 'सीईओ'लाच बनाव लागलं फूड डिलिव्हरी बॉय... | पुढारी

 Zomato CEO : सरत्या वर्षी झोमॅटोच्या 'सीईओ'लाच बनाव लागलं फूड डिलिव्हरी बॉय...

पुढारी ऑनलाईन डेस्क : नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला फूड डिलिव्हरी ॲप्सच्या ऑर्डरमध्ये मोठी वाढ झालेली पाहायला मिळाली.  झोमॅटो मध्येही ऑनलाईन फु़ड डिलिव्हरीला मागणी होती.  झोमॅटो फूड डिलिव्हरी ॲप्सला एवढी मागणी होती की, सीईओ दीपिंदर गोयल यांना फूड डिलिव्हरी बॉय म्हणून जावं लागलं.

 Zomato CEO : सीईओ गोयल यांनाच डिलिव्हरी बॉय म्हणून जावं  लागलं

झोमॅटोचे सीईओ दीपिंदर गोयल हे नेहमी चर्चेत असतात. आता ते पुन्हा त्यांच्या एका कृतीने चर्चेत आले आहेत. सरत्या वर्षाला निरोप देत असताना आणि नव्या वर्षाचं स्वागत करण्यात लोक मग्न होती. आपापल्या परिने  बऱ्याचजणांनी ३१ डिसेंबर साजरा करण्यासाठी फूड डिलिव्हरी ॲप्सच्या माध्यमातून ऑर्डर केली होती. झोमॅटोकडे ऑर्डर एवढ्या होत्या की, कंपनीचे सीईओ दीपिंदर गोयल यांनी स्वत:  डिलिव्हरी बॉय म्हणून जावं  लागलं. त्‍यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन झोमॅटोच्या मुख्यालयात ऑर्डर वितरित करतानाचा फोटो ट्विट केला आहे. यामध्ये त्‍यांनी झोमॅटो ब्रँडच्या लोगोसह लाल टी-शर्ट परिधान केलेला आहे. तसेच त्‍यांच्‍या  हातात खाद्यपदार्थाचे पॅकेटही आहे.  आहे.

गोयल यांनी 31 डिसेंबरला फूड डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत असताना ४  ठिकाणी पार्सल दिली होती. यामध्ये त्‍यांनी एका वृद्ध दाम्‍पत्‍याला पार्सल दिलं. याबद्दलही त्यांनी ट्विट करत अनुभव सांगितला आहे. तसेच त्‍यांनी सर्वांचे आभारही मानले आहेत.  दीपिंदर गोयल  यांना फूड डिलिव्हरी बॉयच्या रुपात पाहून अनेकांच्या भूवया आश्चर्याने उंचावल्या. तसेच पुन्‍हा एकदा चर्चेत आले आहेत.

हेही वाचा.

 

Back to top button