Zomato : आता झोमॅटोवर ऑर्डर करताना ग्राहकांना जादा पैसे मोजावे लागणार | पुढारी

Zomato : आता झोमॅटोवर ऑर्डर करताना ग्राहकांना जादा पैसे मोजावे लागणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : झोमॅटोवर (Zomato) आता खाद्यपदार्थांची ऑर्डर करताना जादा पैसे मोजावे लागणार आहेत. कारण झोमॅटोवर प्रत्येक ऑर्डरवर ग्राहकांना आता 2 रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. यामुळे ऑर्डरच्या किंमतीवर काही परिणाम होणार नाही. परंतु, सेवावर शुल्क द्यावे लागणार आहे. झोमॅटो गोल्डवर ग्राहकांना हे शुल्क द्यावे लागणार आहे. आतापर्यंत हे शुल्क निवडक ग्राहकांकडून घेतले जात होते.

झोमॅटोने  (Zomato) प्रायोगिक तत्वावर प्रत्येक ऑर्डरवर 2 रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रयोग यशस्वी झाला, तर कंपनीला मोठा फायदा होऊन नफा मिळण्याची शक्यता आहे. तर ग्राहकांना काही प्रमाणात आर्थिक झळ बसणार आहे. दरम्यान, हे शुल्क संपूर्ण देशभरात लागू करण्याबाबत कंपनीने अद्याप दुजोरा दिलेला नाही. नफा वाढवण्यासाठी हा प्रयोग सुरू केला आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास संपूर्ण देशभरात राबवला जाण्याची शक्यता आहे. सध्या प्रायोगिक टप्प्यात आहे, असे कंपनीच्या प्रवक्त्याने इकॉनॉमिक टाइम्सशी बोलताना सांगितले.

जून 2023 रोजी संपलेल्या तिमाहीत झोमॅटोला 2 कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळाला आहे. एक वर्षापूर्वी 186 कोटींचा तोटा झाल्यानंतर मार्च 2023 च्या तिमाहीत कंपनीला 189 कोटींचा फटका सहन करावा लागला होता. कंपनीची उलाढाल 2,416 कोटी रुपयांची आहे. कंपनीचा महसूल जून महिन्यात 70.9 टक्क्यांनी वाढला असून नफा 2,416 कोटींवर पोहोचला आहे.

कंपनीने एक्सचेंज फाईलिंगमध्ये जून 2023 मध्ये क्विक कॉमर्समध्ये चांगले योगदान दिले होते. 2021 मध्ये बाजारात आलेल्या झोमॅटो कंपनीच्या आयपीओची इश्यू प्राईस 76 रुपये इतकी होती. कंपनीच्या शेअरचा उच्चांक 163 रुपये आहे.

दरम्यान, झोमॅटोची प्रतिस्पर्धी कंपनी स्विगीने (Swiggy) एप्रिल महिन्यापासून आर्डरवर शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. आता झोमॅटोने प्रत्येक ऑर्डरवर शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा 

Back to top button