Zomato ने ग्राहकासोबत चॅटमध्ये असं काय म्हटलं की #Reject_Zomato ट्रेंड सुरु झाला - पुढारी

Zomato ने ग्राहकासोबत चॅटमध्ये असं काय म्हटलं की #Reject_Zomato ट्रेंड सुरु झाला

पुढारी ऑनलाईन डेस्क

आज सकाळपासून सोशल मीडियावर झोमॅटो ( Zomato ) विरोधात ट्रेंड सुरु झाला आहे. झोमॅटोच्या ग्राहक सेवा अधिकाऱ्याने एका ग्राहकाला सांगितले की, प्रत्येकाला हिंदी भाषा माहित असायला हवी. यावरुनच गोंधळ सुरु झाला आहे. हिंदी लादण्याच्या वादात झोमॅटोचे नाव आले आहे. झोमॅटोची ही मनमानी तामिळनाडूमध्ये सहन केली जाणार नाही. अस ट्विटर लोकांनी म्हटलं आहे. #Reject_zomato हा ट्रेंड सध्या ट्विटरवर सुरु आहे. हे प्रकरण नेमक काय आहे हे जाणून घेऊया.

विकासचे ट्विट आणि गोंधळ सुरु झाला

झोमॅटोवरील ( Zomato ) सगळा गोंधळ विकास नावाच्या ट्विटर वापरकर्त्याच्या ट्विटने सुरू झाला. 18 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी विकासने ट्विट केले आहे.

“मी झोमॅटोकडून जेवणाची मागणी केली आणि त्यात एक वस्तू गहाळ होती. मला हिंदी येत नसल्याने पैसे परत करता येणार नाहीत असे ग्राहक सेवा सांगत आहे. हा धडा वरून देखील शिकवला जात आहे की जर तुम्ही भारतीय असाल तर तुम्हाला हिंदी माहित असायला हवी. मला लबाड म्हटले जात आहे कारण त्याला तमिळ येत नाही. ग्राहकांशी बोलण्याचा हा कोणताही मार्ग नाही. “

या ट्विटमध्ये युजरने त्याच्या चॅटचे स्क्रीनशॉट टाकले आहेत. या संभाषणात हे उघड झाले आहे की जेव्हा ग्राहक चॅटवर बोलत असताना मालाचा तुटवडा असल्याचे सांगतो, तेव्हा ग्राहक सेवा अधिकाऱ्याला रेस्टॉरंटशी बोलण्यास सांगितले गेले. यानंतर सर्व्हिस ऑफिसरने सांगितले की तो स्वतः रेस्टॉरंटशी बोलत आहे पण भाषेमुळे त्याला काहीच समजत नाही. यावर विकास म्हणाले की, जेव्हा झोमॅटो तामिळनाडूमध्ये सेवा देत आहे, तेव्हा त्याने तमिळ समजणाऱ्या लोकांना कामावर घेतले पाहिजे. यावर झोमॅटोच्या वतीने “तुमच्या माहितीसाठी, मी तुम्हाला सांगतो की हिंदी ही आपली राष्ट्रीय भाषा आहे. म्हणून प्रत्येकाला किमान थोडी हिंदी माहित असली पाहिजे. अस म्हटलं आहे.

या उत्तराचा स्क्रीनशॉट ट्विटरवर पोस्ट करण्यात आला आहे. यामुळे गोंधळ वाढला. हे ट्विट व्हायरल झाले. या ट्विटलर काही वेळातच 5 हजारांहून अधिक लाईक्स आणि 2700 पेक्षा जास्त कमेंट्स आल्या आहेत.

ट्विटरवर #Reject_zomato ट्रेंड सुरु झाला

झोमॅटो ग्राहक सेवा एजंटच्या या वर्तनावर लोकांनी नाराजी व्यक्त केली. याला अतिरेक म्हणून संबोधले आणि भारताला एकच राष्ट्रभाषा आहे, या भ्रमातून बाहेर पडण्याचा सल्लाही दिला. तामिळनाडूच्या शरण वापरकर्त्याने ट्विट केलं. त्यात अस म्हटल “प्रिय झोमॅटो, तुमच्या कर्मचाऱ्यांना येथे काम करायच असेल तर त्यांना तमिळ शिकायला सांगा. हे खूप वाईट आहे की ग्राहकाला हिंदी शिकण्यास सांगितले जात आहे. जी आपली राष्ट्रीय भाषा देखील नाही. यासाठी दिलगिरी व्यक्त करा.”

झोमॅटोचे संस्थापकही रिंगणात उतरले

झोमॅटो कंपनीचे संस्थापक दीपिंदर गोयल यांनी झोमॅटोने अधिकृत माफी मागितल्यानंतर काही तासांनी ट्विट केले आणि ग्राहक सेवा एजंटला काढून टाकले. यामध्ये त्यांनी या संपूर्ण गोंधळावर प्रश्न उपस्थित केले. त्याने ग्राहक सेवा एजंटच्या उत्तराला चूक म्हटले. या घटनेबद्दल त्यांनी चार ट्विट केले.

यात त्यांनी ”एका फुड डिलीव्हरी कंपनीच्या सपोर्ट सेंटरमध्ये एकाच्या चुकीचा राष्ट्रीय मुद्दा होतो. आपल्या देशात सहनशीलतेचा स्तर यापेक्षा जास्त असायला पाहिजे. यात कोणाची चुक आहे? यासह आम्ही कस्टमर सर्विस एजंटला पुन्हा कामावरती घेतलं आहे. ही काही असी गोष्ट नाही की त्याला कामावरुन काढल पाहिजे. ही अशी गोष्ट आहे जी ती सहज शिकू शकते आणि पुढे सुधारू शकते. आणि लक्षात ठेवा, आमचे कॉल सेंटर एजंट हे तरुण आहेत जे त्यांच्या करिअर आणि शिकण्याची सुरुवात करत आहेत. ते भाषा आणि प्रादेशिक भावनांच्या संवेदनशीलतेचे तज्ञ नाहीत. मी सुद्धा नाही. हे सर्व असूनही, आपण एकमेकांच्या कमतरतेबद्दल अधिक सहनशील असले पाहिजे आणि एकमेकांच्या भाषेचा आणि प्रादेशिक भावनांचा आदर केला पाहिजे. तमिळनाडू आम्ही तुमच्यावर संपूर्ण देशाप्रमाणेच प्रेम करतो. ना जास्त ना कमी. आम्ही एकमेकांसारखे आहोत.”

अस ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे.

हेही वाचलत का?

Back to top button