पुढारी ऑनलाईन डेस्क : डेव्हिड वॉर्नरची अर्धशतकी खेळी आणि दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांनी केलेल्या कंजूस गोलंदाजीच्या जोरावर दिल्लीने कोलकाता नाईट रायडर्सचा ४ विकेट्सचा पराभव केला. हा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळवण्यात आला होता. दिल्लीने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि केकेआरला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या केकेआरला १२७ धावा करता आल्या.
केकेआरकडून जेसन रॉय आणि आंद्रे रसेल शिवाय कोणालाही मोठी खेळी करता आली नाही. आंद्रे रसेलने अंतिम षटकांत केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर केकेआरला १२७ धावा करता आल्या. केकेआरने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना डेव्हिड वॉर्नरने अर्धशतक झळकावले. तर अक्षर पटेल दिल्लीला विजय मिळवून देण्यासाठी शेवटच्या षटकापर्यंत क्रिजवर टिकून राहिला. केकआरकडून वरुण चक्रवर्ती, अनुकूल रॉय आणि नितीश राणाने प्रत्येकी २ विकेट्स पटकावल्या. डेव्हिड वॉर्नरची अर्धशतकी खेळी आणि दिल्लीच्या गोलंदाजांच्या कंजूस गोलंदाजीच्या जोरावर दिल्लीने केकेआरचा ४ विकेट्सने पराभव केला.
तत्पूर्वी कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्ससमोर 128 धावांचे लक्ष्य दिले होते. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना कोलकाता संघ 20 षटकांत 127 धावांवर गारद झाला. कोलकाताची सुरुवात खूपच खराब झाली आणि संघाने सुरुवातीपासूनच नियमित अंतराने विकेट गमावल्या. लिटन दास चार, कर्णधार नितीश राणा चार, मनदीप सिंग 12 धावा, रिंकू सिंग 6 धावा आणि सुनील नरेन 4 धावा करून बाद झाले. व्यंकटेश अय्यर आणि अनुकुल रॉय यांना खातेही उघडता आले नाही. शेवटच्या षटकात आंद्रेस रसेलने मुकेश कुमारला लागोपाठ तीन चेंडूत तीन षटकार ठोकले. वरुण चक्रवर्ती (१) शेवटच्या चेंडूवर धावबाद झाला. रसेलने 31 चेंडूत एक चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 38 धावा केल्या. रसेलने शेवटच्या ओव्हरमध्ये केलेल्या फटकेबाजीमुळे कोलकाताने १२७ धावांपर्यंत मजल मारली.
हेही वाचा;