पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्रीय राखीव पोलीस दलात (सीआरपीएफ) कॉन्स्टेबल पदासाठी बंपर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली होती. आता या भरती प्रक्रियेमधील मोठी अपडेट समोर आली असून, अर्ज करण्याची अंतिम तारीखेमध्ये वाढ करण्यात आली आहे. या पदांसाठी पूर्वी अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ एप्रिल २०२३ होती. आता या भरतीसाठी २ मे २०२३ अंतिम तारीख करण्यात आली आहे. ( CRPF constable Recruitment )
यापूर्वी सीआरपीएफच्या या भरती मोहिमेद्वारे एकूण ९२१२ पदे भरली जाणार होती. यापैकी ९१०५ पदे पुरुष उमेदवारांसाठी आहेत तर १०७ पदे महिला उमेदवारांसाठी आहेत. मात्र आता त्यात आणखी १४८ पदांची भर पडली आहे. या पदांवर बगलर, स्वयंपाकी, सफाई कामगार, ड्रायव्हर, नाई, धुलाई आणि सुतार यांचाही समावेश आहे.
केंद्रीय राखीव पोलिस दलातील बंपर पदांसाठी उमेदवारांच्या अर्जाची अंतिम तारीख आणखी वाढवण्यात आली आहे. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार अधिकृत वेबसाइट crpf.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. पूर्वी अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 एप्रिल 2023 होती, आता ती 02 मे 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल उमेदवारांनी केंद्र किंवा राज्य सरकारद्वारे मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून १० वी उत्तीर्ण केलेली असावी. कॉन्स्टेबल भरती उमेदवाराकडे हेवी ट्रान्सपोर्ट व्हेईकल ड्रायव्हिंग लायसन्स असणे किंवा ड्रायव्हिंग चाचणी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) पदासाठी १८ ते २७ वर्षांच्या दरम्यान ठेवण्यात आली आहे. तर इतर पदांसाठी ती १८ ते २३ वर्षांच्या दरम्यान असावी असे सांगण्यात आले आहे.
केंद्रीय राखील पोलिस दलातील (CRPF) कॉन्स्टेबल या पदांसाठी अर्ज करण्यासाठी पुरुष उमेदवारांना १०० रुपये शुल्क भरावे लागेल. तर महिला उमेदवार आणि एससी, एसटी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
हेही वाचा :