Deepak Chahar (Video) : बायकोच्या हट्टापुढे थिरकला चहर पण …..

Deepak Chahar (Video)  : बायकोच्या हट्टापुढे थिरकला चहर पण .....
Deepak Chahar (Video) : बायकोच्या हट्टापुढे थिरकला चहर पण .....

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चहरने १ जूनला जया भारद्वाज हिच्याशी लगीनगाठ बांधली. आज (दि. १९ जून) त्याने लग्नातील एका व्हिडीओ सोशल मीडीयावर शेअर केला आहे. ताे काही वेळातचं सोशल मीडीयावर प्रचंड व्हायरल झाला आहे. यामध्ये दीपक चहर त्याच्या पत्नीसोबत डान्स करताना दिसत आहे. दीपक चहरने केलेल्या डान्सवर लोकांनी मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. Deepak Chahar (Video)

दीपक चहरने हा व्हिडीओ शेअर करताना म्हटले आहे की, "मला पत्नीसोबत नाईलाजास्तव डान्स करावा लागला. या काळातील क्रिकेटच्या सामन्यामुळे मी दबावात होतो." दीपक चहरला दुखापत झाल्याने आयपीएल २०२२ मधून बाहेर पडावे लागले होते. त्यानंतर भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चहरने १ जूनला त्याची प्रियसी जया भारद्वाज हिच्याशी लगीन गाठ बांधली. दीपक चहर आणि जया भारद्वाज यांचा विवाह दिल्लीच्या जेपी पॅलेस येथे संपन्न झाला होता. चहरच्या रिसेप्शन पार्टीसाठी भारतीय संघातील दिग्गज क्रिकेटपटूंनी हजेरी लावली होती. Deepak Chahar (Video)

आपल्या स्विंग गोलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या दीपक चहरला वेस्टइंडिज विरूद्धच्या टी-२० सामन्यादरम्यान दुखापत झाली होती.
यानंतर आयपीएल २०२२ च्या हंगामातून त्याला बाहेर पडावे लागले होते. चेन्नई सुपर किंग्जने दीपक चहरवर १४ कोटींची बोली लावत त्याचा आपल्या संघात समावेश केला होता. Deepak Chahar (Video)

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news