Sara Ali Khan troll : फादर्स डेच्‍या ‘सेलिब्रेशन’वरुन सारा अली खान झाली ट्रोल | पुढारी

Sara Ali Khan troll : फादर्स डेच्‍या 'सेलिब्रेशन'वरुन सारा अली खान झाली ट्रोल

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान नेहमी स्टाईल आणि फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. सध्या सारा तिच्या वडील सैफ अली खानसोबत लंच डेटवर स्पॉट झाली. सारा वडिलांसोबत तोकड्या कपड्यात फिरते यावरून तिला ट्रोलिंगचा ( Sara Ali Khan troll )  सामना करावा लागत आहे.

वडील सैफ अली खान आणि भाऊ इब्राहिमसोबत सारा फादर्स डेच्या आदल्या दिवशी डिनरसाठी एका हॉटेलमध्ये जाताना स्पॉट झाली. या घटनेचा एका व्हिड[ओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. यावेळी साराने क्रिम रंगाची शॉर्ट्ससोबत पांढऱ्या रंगाच्या क्रॉप टॉपमध्ये दिसली. सैफ अली खानने आकाशी रंगाचा टी शर्ट आणि ब्लू रंगाच्या जीन्स परिधान केली होती. साराचा भाऊ इब्राहिम  निळ्या रंगाच्या फॉर्मल शर्टमध्ये दिसला. साराने परिधान केलेल्या शॉर्ट्समधून तिचे पॉकेटस् बाहेर दिसते होते. यामुळे तिला सोशल मीडियावरील नेटकऱ्यांनी चांगलेच धारेवर घरले आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी भरभरून आपआपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात काही नेटकऱ्यांनी कौतुक तर काही नेटकऱ्यांना साराचे तोकड्या कपड्यावरू चांगलेच सुनावले आहे. यात ‘साराला खिशाच्या लांबीला तिची पँट नाही काय’, ‘कोणी लंच डेटला असे कपडे घालते काय? मला वाटले मीच जिमला गेलो होतो. साराच्या वडीलांचा पोशाख चांगला होता परंतु, सारा कपडे सूट करत नव्हते. अजुनही वडीलांसोबत बालपणीच्या कपड्यात फिरतेय,  असे म्हटले आहे. याआधीही सारा तोकड्या कपड्यावरून ट्रोल ( Sara Ali Khan troll ) झाली होती.

सारा अली खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती लक्ष्मण उतेकर यांच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत बॉलिवूड अभिनेता विक्की कौशल मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय ती ‘गॅसलाइट’ या चित्रपटात दिसणार आहे. यात अभिनेता विक्रांत मॅक्सी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

हेही वाचलंत का? 

(video, photo : instantbollywood, eliteshowbiz वरून साभार)

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

 

View this post on Instagram

 

A post shared by Elite (@eliteshowbiz)

Back to top button