Credit Suisse Free Fall – युरोपमधील 3 बँका संकटात? ‘२००८’च्या पुनरावृत्तीची भीती

Credit Suisse Free Fall – युरोपमधील 3 बँका संकटात? ‘२००८’च्या पुनरावृत्तीची भीती
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : युरोपीयन बँकिंग व्यवस्था सध्या संकटात सापडल्याचे चित्र आहे. क्रेडिट सुस, स्वीस बँक आणि डॉएच बँक अशा तीन मोठ्या बँकांचे शेअर सातत्याने कोसळत आहेत. २००८मध्ये अमेरिकेत लेहमन ब्रदर्स ही बँक दिवाळखोरीत निघाल्यानंतर जग आर्थिक मंदीच्या संकटात सापडले होते. सध्याच्या युरोपियन बँकांच्या शेअर्समधील मोठ्या घसरणीमुळे जग पुन्हा एकदा मंदीच्या खाईत ढकलेले जाईल का अशी भीती व्यक्त होत आहे. (Credit Suisse Free Fall a Reminder of Lehman moment)

इकॉनॉमिक टाईम्स, लाईव्ह मिंट अशा अर्थविषयक वेबसाईट्सनी याबद्दलचे वृत्त दिले आहे.

क्रेडिट सुसचे शेअर एका दिवसात १० टक्केंनी तर डॉएच बँकेचे शेअर एक दिवसात ५टक्केंनी खाली आले आहेत. क्रेडिट सुसचे शेअर गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास ६० टक्केंनी घसरले आहे. इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या बातमीनुसार क्रेडिट सुस २७ ऑक्टोबरला दिवाळखोरी टाळण्यासाठीचे नियोजन सादर करणार आहे.

अमेरिकेतील शेअर बाजाराचा तज्ज्ञ ग्राहम स्टिफन म्हणतात, "जेव्हा लेहमन ब्रदर्स बँक कोलमडली तेव्हा त्यांची संपत्ती ६०० अब्ज डॉलरची होती. डॉएच बँक आणि क्रेडिट सुस यांच्या व्यवस्थापनाखालील एकूण संपत्ती २८०० अब्ज डॉलर इतकी आहे. क्रेडिट सुस आता संकटात आहे, जगासमोर काय वाढून ठेवले आहे, हे आपल्याला माहिती नाही."

या दोन्ही बँकांचे शेअर एक वर्षात ४० टक्केंनी कोसळले आहेत, असे स्टिफन यांनी म्हटले आहे.

क्वाँटम इंडियाचे सीआयओ अरविंद चारी यांनी २००८ आणि आताच्या स्थितीत फरक असल्याचे म्हटले आहे. इकॉनॉमिक टाईम्सने चारी यांची मत प्रसिद्ध केले आहे. ते म्हणाले, "२००८मध्ये जे घडले तो कर्जाशी संबंधित विषय होता. आताच्या स्थितीत एखाद्या सेक्टरमधील कर्ज तणावात आहे असे दिसत नाही. आता जे घडत आहे ते ट्रेडिंगशी संबंधित आहे. भारताबद्दल बोलायचे तर आपल्या बँका फार चांगल्या स्थितीमध्ये आहेत."

क्रेडिट सुसचे सीईओ उल्रीच कोएर्नर यांनी बँकेची स्थिती चांगली असल्याचे म्हटले आहे. "बँकेचे भांडवल आणि तरलता चांगल्या स्थितीत आहे. शेअर बाजारातील रोजचे चढउतार याची तुलना बँकेची भांडवल, तरलता यांच्याशी करता येणार नाही."

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news