पुढारी ऑनलाईन: देशभरातील कोरोना संख्येत किंचशी घट झाल्याने, कोरोनाच्या वाढत्या संक्रमणापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. सध्याच्या अपडेटनुसार गेल्या २४ तासांत ९१११ नवीन कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. सक्रिय कोरोना रूग्णांची संख्या ही ६० हजार ३१३ इतकी झाली आहे. काल (दि.१६) देशात १००९३ कोरोना रुग्णांची नोंद (COVID-19 Update) करण्यात आली होती, अशी माहिती केंद्रिय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे.
सध्या देशात एकूण सक्रिय कोरोना रूग्णांची संख्या ६० हजार ३१३ इतकी आहे. तसेच ६ हजार ३१३ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. आत्तापर्यंत ४,४२,३५,७७२ इतके रूग्ण कोरोना संक्रमणातून बरे झाले आहेत. सध्याच्या आकडेवारीनुसार,कोरोना पॉझिटिव्हिटी रेट (COVID-19 Update) ९८. ६८ टक्के आहे.
आत्तापर्यंत ९२.४१ कोटी COVID-19 टेस्ट करण्यात आल्या आहेत. यामध्ये काल रविवारी (दि.१६) दिवसभरात १ लाख, ८ हजार ४३६ इतक्या COVID-19 टेस्ट करण्यात आल्या, अशी माहिती (COVID-19 Update) आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे.
रविवारी (दि.१६) महाराष्ट्रात ६५० नवीन कोरोना रूग्णांची नोंद (COVID-19 Update) झाली आहे. तर दोनजणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रातील कोरोना संक्रमण झालेल्या रुग्णांची संख्या ८१,५५,८३९ पर्यंत पोहचली आहे, असे राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीत सांगितले आहे.