

[web_stories title="true" excerpt="false" author="false" date="false" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="10" order="ASC" orderby="post_date" view="circles" /]
नवी दिल्ली : जगभरात च्युईंगम (chewing gum) हा पदार्थ मोठ्या प्रमाणात चघळत त्याचा आस्वाद घेतला जातो. तरुणाईला आवडणारा हा पदार्थ पृथ्वीसाठी मात्र धोकादायक ठरू लागला आहे. कारण च्युईंगमचे नैसर्गिकरित्या विघटन होत नाही. ते नष्ट न होता प्लास्टिकसारखे कायमस्वरूपी तसेच राहते. यामुळे ते प्रदूषणाचे कारण बनते.
एका आकडेवारीनुसार जगभरात दरवर्षी लोक सुमारे 1,00,000 टन च्युईंगम चघळतात. जेव्हा च्युईंगमचा शोध लागला नव्हता, तेव्हा लोक चीकल नावाच्या फळाचा डिंकासारखा पदार्थ चघळायचे. 1950 च्या दशकात चीकलची जागा सिंथेटिक गमने घेतली. आधुनिक च्युईंगममध्ये वनस्पती तेल, इमल्सीफायरसारख्या सॉफ्टनरचा वापर केला जातो. जे चिकटपणा कमी करतात. मात्र याच सिथेंटिक गमचे विघटन होत नाही. प्लास्टिकसारखे त्याचे अस्तित्व कायम राहू शकते. यामुळेच ते प्रदूषणाचे कारणही बनते.
[web_stories title="true" excerpt="true" author="true" date="true" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="1" order="ASC" orderby="post_date" view="list" /]
तसे पाहिल्यास च्युईंगम खाण्याचे काही फायदे आहेत, तसे तोटेही आहेत. च्युईंगम हा केवळ चावण्याचा पदार्थ असून, त्याला गिळायचे नसते. काही संशोधनातील निष्कर्षानुसार, च्युईंगम खाल्ल्याने एकाग्रता वाढण्यास मदत होते व मेंदूतील रक्तसंचार वाढतो. तसेच जादा ऑक्सिजन पोहचते. असे काही फायदे होतात तसे तोटेही होतात. सतत चावत आणि चघळत राहिल्याने जबडा दुखू लागतो. मात्र, याच च्युईंगमचे नैसर्गिकरित्या विघटन होत नाही. ते नष्ट न होता प्लास्टिकप्रमाणेच प्रदूषण वाढवण्यास जबाबदार ठरत आहे.