पुढारी वृत्तसेवा, नवी दिल्ली : चे औचित्य साधत काँग्रेस पक्षाकडून सोमवारी देशाची राजधानी दिल्लीमध्ये आझादी गौरव यात्रा काढण्यात आली. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वधेरा, आनंद शर्मा, गुलाम नबी आझाद यांच्यासह कार्यकर्त्यांनी यात्रेत मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.
असंख्य लोकांनी स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेऊन आपल्या परीने योगदान दिले. या लोकांबरोबरच स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण करणाऱ्या शहिदांचे स्मरण करण्याचा आजचा दिवस असल्याचे राहुल गांधी यांनी यावेळी सांगितले. देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी आपण कटिबद्ध होण्याची गरज असल्याचे प्रियांका गांधी-वधेरा यांनी नमूद केले. काँग्रेस मुख्यालय ते गांधी स्मृती दरम्यान काँग्रेसकडून आझादी गौरव यात्रा काढण्यात आली. तत्पूर्वी पक्षाच्या नेत्या अंबिका सोनी यांच्या हस्ते पक्ष मुख्यालयात तिरंगा फडकविण्यात आला. सोनिया गांधी यांना कोरोना झालेला असल्याने त्या कार्यक्रमात भाग घेऊ शकल्या नाहीत.
हेही वाचलंत का?