पुढारी ऑनलाईन – काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत मल्लिकार्जून खर्गे यांनी शशी थरूर यांना पराभूत करत विजय मिळवला. पण थरूर यांना मिळाले मते काँग्रेसमधील अनेकांसाठी धक्का देणारी ठरली आहेत. खर्गे यांना ७८९७ मते मिळाली तर थररू यांना १०७२ मते मिळाली आहेत. (Congress President Election, Tharoor surprise with 1072 votes)
१९९७ला शरद पवार, राजेश पायलट यांनी सीताराम केसरी यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत केसरी यांना ८८२ तर पायलट यांना ३५४ मते मिळाली होती. तर केसरी यांनी ६,२२४ मते मिळवत निवडणूक जिंकली होती. थररू यांनी १०७२ म्हणजे पवारांपेक्षाही जास्त मते घेतली आहेत. खर्गे यांना ८४.१४ टक्के इतकी मते मिळाली आहेत तर थररू यांच्या मतांची टक्केवारी ११.४ टक्के आहे. खर्गे यांना ज्या पद्धतीने पाठिंबा मिळाला होता, ते लक्षात घेता थररू यांना एक हजारावर मते घेणे, हीसुद्धा मोठी बाब मानली जात आहे.
या निकालावर प्रतिक्रिया देताना थररू यांनी खर्गे यांचे अभिनंदन केले आहे. ते म्हणाले, "पक्षाचे नवे अध्यक्ष माझे सहकारी आहेत. त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांच्या मार्गदर्शनखाली आम्ही एकत्रितपणे पक्षाला नव्या उंचीवर नेऊ."
थरूर यांनी जरी खर्गेंचे अभिनंदन केले असले तरी निवडणूक प्रक्रियेवर थररू गटाने सातत्याने आक्षेप घेतले होते. मतदानाच्या दिवशी उत्तर प्रदेशमधील प्रक्रियेत त्रुटी असल्याचा आक्षेप घेत थररू यांच्या सहकाऱ्यांनी उत्तर प्रदेशातील मतदान रद्द करण्याची मागणी केली होती.
हेही वाचा