Commericial LPG Cylinder : व्यावसायिक सिलिंडर पुन्हा एकदा महागले

Commericial LPG Cylinder : व्यावसायिक सिलिंडर पुन्हा एकदा महागले
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :

इंधन दरवाढीमुळे महागाईचा भडका उडाला असतानाच व्यावसायिक सिलिंडर ( Commericial LPG Cylinder ) पुन्हा एकदा महाग झाला आहे. व्‍यावसायिक सिलिंडरच्‍या किंमती १०२ रुपयांनी वाढल्‍या आहेत. एप्रिल महिन्‍यात या किंमतीमध्‍ये २६८ रुपयांनी वाढ झाली होती. दरम्‍यान, एकीकडे व्‍यावसायिक सिलिंडरच्‍या किंमती वाढल्‍या असल्‍या तरी घरगुती सिलिंडरच्‍या किंमतीमध्‍ये वाढ झालेली नाही, ही दिलासादायक बाब आहे.

इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्‍या माहितीनुसार, दिल्‍ली आजपासून व्‍यावसायिक १९ किलोग्रॅम सिलिंडरसाठी ( Commericial LPG Cylinder ) २ हजार ३५५ रुपये मोजावे लागणार आहे. यापूर्वी एका व्‍यावसायिक सिलिंडरची किंमत २ हजार २५३ रुपये होती. आता नवीन दरानुसार कोलकाता, मुंबई आणि चेन्‍नई येथे एका सिलिंडरसाठी अनुक्रमे २४५५, २३०७ आणि २५०८ रुपये मोजावे लागणार आहेत.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news