Climate in 2023 : २०२३ ठरले दुसरे सर्वात उष्ण वर्ष; जाणून घ्या हवामानाबदल सविस्तर

तापमान
तापमान

पुढारी ऑनलाईन डेस्क : गतवर्ष २०२३ हे १९०१ पासूनचे दुसरे सर्वात उष्ण वर्ष ठरले आहे. दरम्यान, पृथ्वीच्या पृष्ठभागावरील हवेचे तापमान दीर्घकालीन सरासरीपेक्षा +0.65°C होते. यापूर्वी २०१६ हे सर्वात उष्ण वर्ष ठरले होते. यावेळी सर्वाधिक तापमानवाढ, +0.710°C असे नोंदवण्यात आले होते. सन १९०१ पासून तापमानवाढीच्या नोंदी केल्या जात आहेत. या संदर्भातील माहिती आयएमडी पुणेचे प्रमुख डॉ. के. एस. होसाळीकर यांनी दिली आहे. (Climate in 2023)

Climate in 2023 : मान्सूनपूर्व पावसाची सर्वाधिक सरासरी ११३ टक्के नोंद

दरम्यान, पावसाळा ऋतूत 2023 या संपूर्ण वर्षात देशात ९५ टक्के पाऊस झाला. हिवाळ्यात जवळपास ५६ टक्के पाऊस झाला. मान्सूनपूर्व पावसाची सर्वाधिक सरासरी ११३ टक्के नोंद करण्यात आली आहे. दक्षिण मान्सूनच्या प्रभावामुळे देशात ९४.४ टक्के पाऊस झाला. तर मान्सूननंतर सरासरी ९१ टक्के पाऊस झाला असल्याचे आयएमडीने स्पष्ट केले आहे. (Climate in 2023)

गतवर्षात 'या' चक्रीवादळांचा तडाखा

गेल्या वर्षभरात उत्तर हिंद महासागरात एकूण सहा चक्रीवादळे निर्माण झाली. यामधील तीन चक्रीवादळे ही अत्यंत तीव्र होती. यामध्ये मोचा, बिपरजॉय आणि तेज अशा चक्रीवादळांचा समावेश होता. तर तीव्र चक्रीवादळामध्ये हामून मिचाँग आणि मिधीली या चक्रीवादळांचा समावेश असल्याचे हवामान विभागाने दिलेल्या माहितीत म्हटले आहे. (Climate in 2023)

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news