पुणे : पुढारी वृत्तसेवा : खराब हवामानामुळे पुण्यातून दिल्ली, लखनौ, हैदराबाद, अमृतसर, गोवा या ठिकाणांसाठी होणारी नऊ विमान उड्डाणे गुरुवारी रद्द करण्यात आली. त्यामुळे पुणेकरांचा नियोजित प्रवास रखडला. परिणामी, त्यांची महत्त्वाची कामे होऊ शकली नाहीत. परिणामी, त्यांना मनस्ताप सहन करावा लागला. वाढत्या प्रदूषणामुळे देशातील वातावरणामध्ये सातत्याने बदल होत आहेत. त्याचा परिणाम देशभरातील विविध यंत्रणांवर होत आहे.
असाच परिणाम, विमान वाहतुकीवरदेखील होत आहे. काही दिवसांपासून पुण्यातून बाहेरील राज्यांमध्ये जाणारी व पुण्यात येणारी विमाने रद्द केली जात आहेत. यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यांची नियोजित कामे लांबणीवर पडत आहेत.
मागील काही आठवड्यांपूर्वी मिचाँग वादळामुळे दक्षिण भागात जाणारी अनेक विमानोड्डाणे रद्द करण्यात आली होती. आता पुन्हा खराब हवामानाचा फटका बसल्यामुळे 9 विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
हेही वाचा