विनायक मेटे अपघात प्रकरणी सीआयडीच्या हाती लागले पुरावे, चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

vinayak mete
vinayak mete

बीड, पुढारी वृत्तसेवा : शिवसंग्रामचे प्रमुख विनायक मेटे यांच्या मृत्यूप्रकरणातील सबळ पुरावे सीआयडीच्या हाती लागले आहेत. तीन महिन्यांपूर्वी (१४ ऑगस्ट) मुंबई-पुणे महामार्गावर कार अपघातात त्यांचा मृत्यू झाला होता. या अपघाताला मेटे यांचा कारचालक जबाबदार असल्याची माहिती सीआयडीच्या तपासात समोर आली आहे. या प्रकरणी वाहन चालकावर रसायनी पोलीस स्टेशनमध्ये कलम 304 (दोन) नुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला आहे.

शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या अपघाताची सीआयडीकडून चौकशी सुरू होती. चौकशीत विनायक मेटेंची गाडी ज्या मार्गाने गेली त्या मार्गावरील सीसीटीव्ही तपासण्यात आले. याशिवाय तज्ज्ञांची एक समिती तयार करून त्यांच्याकडूनही याप्रकरणी मतं घेतली गेली. या समितीत आयआरबीचे अभियंता आणि इतरांचा समावेश होता. हा अपघात चालकाने अतिवेगाने गाडी चालवल्यामुळे तसेच वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे झाल्याचे समोर आले यामुळे चालक एकनाथ कदमविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून लवकरच त्याला अटक होण्याची शक्यता आहे.

नेमक काय घडल होतं?

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे आणि शिवसंग्राम पक्षप्रमूख विनायक मेटे हे त्यांच्या इंडिव्हर गाडी क्रमांक एम एच- 01, डीपी-6364 मधून 14 ऑगस्ट रोजी मुंबईच्या दिशेने जात होते. पहाटे पाचच्या सुमारास किमी नंबर १५/९०० या ठिकाणी त्यांच्या गाडीवरील चालकाचा ताबा सुटला आणि त्यांच्या पुढे जाणाऱ्या अज्ञात वाहनाला ठोकर बसून अपघात झाला होता. पनवेल ते खालापूर दरम्यानच्या मांडप बोगद्याजवळ हा अपघात घडला होता. या अपघातात ते गंभीररित्या जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला होता. तसेच बॉडीगार्ड राम ढोबळे आणि गाडीचालक एकनाथ कारभारी कदम हे जखमी झाले होते.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news