Jabalpur Murder Case : "बेवफाई नहीं करना"; खून करून तरुणीच्या मृतदेहाचा व्हिडिओ केला शेअर | पुढारी

Jabalpur Murder Case : "बेवफाई नहीं करना"; खून करून तरुणीच्या मृतदेहाचा व्हिडिओ केला शेअर

पुढारी ऑनलाईन डेस्क : लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असलेल्या वसईतील एका मुलीचा प्रियकराने खून केला. त्यानंतर तिच्या शरीराचे ३५ तुकडे करून दिल्लीजवळील जंगलात फेकून दिले. या घटनेमुळे देशभर खळबळ उडाली असताना अशाच प्रकारची आणखी एक धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील जबलपूरमधून (Jabalpur Murder Case) समोर आली आहे.

एका व्यक्तीने तरुणीचा गळा चिरून निर्घृण खून केला. आणि तिच्या मृतदेहासोबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ही घटना एका आठवड्यापूर्वी जबलपूरमधील मेखला रिसॉर्टमध्ये घडली. अभिजित पाटीदार असे संशयित आरोपीचे नाव आहे. तर शिप्रा झरिया (वय २५) असे खून झालेले तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी अद्याप अभिजित पाटीदारला अटक केलेली नाही. जबलपूरमधील (Jabalpur Murder Case) मेखला रिसॉर्टमधील एका खोलीतून तिचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आला आहे.

Jabalpur Murder Case : सर्व व्हिडिओ मृत तरुणीच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट

अभिजितने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो “बेवफाई नहीं करना असे म्हणत आहे. त्यानंतर तो एक ब्लँकेट उचलून अंथरुणात गळा चिरलेल्या तरुणीचा मृतदेह दाखवत असल्याचे दिसत आहे. तसेच ‘स्वर्ग में फिर मिलेंगे’ असेही तो म्हणत आहे. हे सर्व व्हिडिओ मृत तरुणीच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट केले आहेत. ते आता काढून टाकण्यात आल्याचे दिसते. तर इंस्टाग्रामवर अजूनही अनेक फोटो आहेत. जे तिच्या हत्येनंतर पोस्ट करण्यात आले आहेत.

मित्राच्या सांगण्यावरून अभिजितने केला खून

दरम्यान, अभिजितने स्वतःची ओळख पटना येथील व्यापारी म्हणून केली आहे. त्या तरुणीचे त्याच्या व्यवसायातील भागीदार जितेंद्र कुमार याच्यासोबत प्रेमसंबंध होते. अभिजितने असा दावा केला आहे की, मृत तरुणीने जितेंद्रकडून सुमारे १२ लाख रुपये उसने घेतले होते. आणि ती जबलपूरला पळून गेली होती. जितेंद्रच्या सांगण्यावरून आपण तरुणीचा खून केल्याचे त्याने सांगितले.

Jabalpur Murder Case : अभिजितच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना

एसएसपी प्रियंका शुक्ला यांनी सांगितले की, अभिजितच्या शोधासाठी मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातच्या वेगवेगळ्या भागात पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. एएसपी शिवेश बघेल यांनी सांगितले की, आरोपींनी मेखला रिसॉर्टमध्ये ६ नोव्हेंबर रोजी एक खोली बुक केली होती. सीसीटीव्ही फुटेजमध्ये असे दिसून येत आहे की, अभिजित त्या रात्री रिसॉर्टमध्ये एकटाच राहिला होता. तर दुसऱ्या दिवशी ती तरुणी त्याच्याकडे आली. त्यांनी जेवणाची ऑर्डर दिली आणि तासाभरानंतर खोलीला कुलूप लावून अभिजित हॉटेलमधून निघून गेला.

मृत तरुणीची राखी मिश्रा अशी बनावट ओळख 

आयडीवर मृत तरुणीची ओळख राखी मिश्रा अशी नोंद करण्यात आली होती. ती अधिकाऱ्यांना बनावट असल्याचे आढळून आले आहे. रिसॉर्टच्या कर्मचार्‍यांनी सांगितले की, रविवारी तरुणी अभिजित पाटीदारसोबत काही तास घालवून निघून गेली. तर पाटीदार रिसॉर्टमध्येच थांबला होता. मात्र, ती तरुणी सोमवारी पुन्हा रिसॉर्टमध्ये आली. त्यानंतर अभिजित रिसॉर्टमधून निघून गेला. तर तरुणी खोलीमध्येच होती. मंगळवारी सकाळपर्यंत महिलेने दरवाजा न उघडल्याने कर्मचाऱ्यांनी मास्टर चावीने दरवाजा उघडला. त्यावेळी तरुणीचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह दिसून आला.

हेही वाचलंत का ? 

Back to top button